Unique Marriage News, Unique Wedding News SaamTvNews
देश विदेश

बाबो! एक मुलगा दोन मुलींच्या प्रेमात; दोघींसोबत एकाच मंडपात लग्न

यापैकी पहिल्या मुलीकडून त्याला एक मूलही आहे.

वृत्तसंस्था

झारखंड - लोहरदगा जिल्ह्यातील भंडारा ब्लॉकमधील बंदगाई येथील संदीप ओराव नावाचा तरुण एकाच वेळी चक्क दोन मुलींच्या प्रेमात पडला आहे. संदीपचे गेल्या ३ वर्षांपासून दोन मुलींशी प्रेमसंबंध होते. यापैकी पहिल्या मुलीकडून त्याला एक मूलही आहे. (Unique Wedding Latest Marathi News)

संदीपचे दोन्ही मैत्रिणींसोबत अनेकदा वादही झाले होते.त्यानंतर हे प्रकरण गावापर्यंत पोहोचले आणि रविवारी गावकऱ्यांनी बंदगाईत सामाजिक सभा घेऊन या दोन मुलींचे संदीपशी लग्न लावून दिले. या विवाह (Marriage) सोहळ्यात गावातील कुटुंबीय आणि पहिल्या प्रियसीचा मुलगाही सहभागी झाले होते.

हे देखील पाहा -

ब्लॉकच्या आकाशी पंचायत अंतर्गत बांदा पत्राटोली येथील रहिवासी संदीप ओराव या युवकाचे गदरपो पंचायतीच्या धानामुंजी गावातील रहिवासी कुसुमशी गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. लग्नापूर्वी दोघांना एक मुलगाही आहे. तर बंगालमधील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत असताना बागडू पंचायतीच्या पत्रातु महतो टोली येथील स्वाती या तरुणीशी वर्षभरापूर्वी प्रेमसंबंध होते.

दोन्ही तरुणींचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने अनेकदा वाद झाला. यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीयांच्या संमतीने रविवारी सामाजिक रितीरिवाजांनुसार दोन्ही मुलींचे लग्न लावून देण्यात आले. संदीपने एका मंडपात दोन तरुणींशी लग्न केल्यानेसध्या गावात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT