हृदयद्रावक! 20 वर्षांच्या विवाहितेला महिलेला झाडाला उलटं बांधून मारहाण... (पहा व्हिडीओ) Saam Tv
देश विदेश

हृदयद्रावक! 20 वर्षांच्या विवाहितेला महिलेला झाडाला उलटं बांधून मारहाण... (पहा व्हिडीओ)

मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे एक लाजीरवाणी घटना घडली आहे. या घटनेत एका युवतीला तिच्याच भावाने व वडिलांनी झाडाला टांगून जिवे मारहाण केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अलिराजपूर- मध्य प्रदेशातील MP अलिराजपूर Alirajpur येथे एक लाजीरवाणी घटना घडली आहे. या घटनेत एका युवतीला तिच्याच भावाने व वडिलांनी झाडाला टांगून जिवे मारहाण केली. यात तिचा एकच दोष होता की ती घरच्यांना न सांगताच मामाकडे निघून गेली होती. A 20 year old married woman was tied to a tree and beaten

परिवारातील सदस्यांना ती तेथून पळून गेली असा संशय आला. यानंतर आरोपींनी तिला मुलीला झाडावर लटकून आणि जमिनीवर पटकून मारहाण केली. आणखी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे तिला मदत करण्याऐवजी लोक या घटनेचा व्हिडिओ Video बनवतही राहिले.

अलिराजपूरपासून 50 कि.मी. अंतरावर बोरी पोलिस स्टेशनच्या बडे फुटालाब गावात 28 जून रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केवळ जामीनपात्र कलम लावून तक्रारीनंतर आरोपीला सोडून दिले आहे.

याबद्दल एसपीने सांगितले की, या महिलेचे लग्न जवळच्या भूरछेवड़ी गावात झाले होते. नानसी यांचे पती काही दिवसांपूर्वी कामासाठी गुजरातमध्ये Gujrat गेले होते. त्याने पत्नीला एकटीला सासरच्या घरात सोडले. यामुळे ती नाराज झाली. त्यामुळे ती तिच्या याबद्दल काहीही सासरच्यांना न सांगता आंबी Ambi गावात आपल्या मामाच्या घरी निघून गेली. नानासीच्या पालकांना तिची माहिती मिळाली. त्यांनी तिला परत आणले आणि तिला जोरदार मारहाण केली. A 20-year-old married woman was tied to a tree and beaten

काय घडले त्यादिवशी :

नानसीला तिचा भाऊ करम, दिनेश, उदय आणि वडील केलसिंग निनामा यांनी खोलीच्या बाहेर खेचले. घरात प्रथम तिला मारहाण केली. तसेच तिला मारत-मारत त्यांच्या शेताकडे नेले. कसलीच दया गया न करता तेथे तिला एका झाडावर टांगण्यात आले. त्यानंतर तिच्यावर काठीने जब्बर मारहाण केली. ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत राहिली पण कोणी तिचे ऐकून घेत नव्हते. यातूनही आरोपींचे मन भरून आले नाही तर झाडावरुन खाली पडले आणि तरीही जमिनीवर उतरवून देखील बेदम मारले.

तिथे उपस्थित लोक केवळ प्रेक्षकांची भूमिका पार पडत होते. जेव्हा मुलीला मारहाण केली तेव्हा काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडीओ बनवून फक्त सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलेच्या निर्दयी चार भावांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT