Pakistani Air Hostess
Pakistani Air Hostess Yandex
देश विदेश

Pakistani Air Hostess: 'थँक्यू PIA'... पाकिस्तानच्या ९ एअरहॉस्टेस रहस्यमयरित्या अचानक गायब

Rohini Gudaghe

Pakistani Air Hostess Missing From Canada

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) ची एक एअरहोस्टेस (Pakistani Air Hostess) कॅनडाला पोहोचल्यानंतर तिच्या हॉटेलच्या खोलीतून अचानक बेपत्ता झाली. ही घटना सोमवारी घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

कॅनडामध्ये आश्रय मागणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. इस्लामाबादहून टेक ऑफ केल्यानंतर २६ फेब्रुवारीला विमान कॅनडात उतरलं होतं. एक दिवसानंतर, एअर होस्टेस मरियम रझाची कराचीच्या परतीच्या फ्लाइटमध्ये ड्युटी होती, पण ती परतली ( Air Hostess Missing News) नाही. एका वर्षात पाकिस्तानच्या ९ एअरहॉस्टेस गायब होण्याची घटना घडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानी एअरहॉस्टेस अचानक गायब

पाकिस्तानी एअरहोस्टेस कॅनडाला पोहोचल्यानंतर तिच्या हॉटेलच्या खोलीतून बेपत्ता झाली होती. PIA अधिकाऱ्यांनी खोलीची झडती घेतली, तेव्हा त्यांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये 'PIA धन्यवाद!' असं लिहिलेलं (Pakistani Air Hostess Missing) होतं. मात्र, विमान प्रवासादरम्यान अधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकारची नोट सहसा प्रवाशांकडून फ्लाइट अटेंडंटला दिली जाते, असं PIA अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एअर होस्टेस मरियम रझाची कराचीला परतीच्या फ्लाइटमध्ये ड्युटी होती, पण ती परतली नाही.

अधिकाऱ्यांनी हॉटेलची खोली झडती घेतली. तेव्हा तिथे तिचा गणवेश पडलेला होता. तेथे एक चिठ्ठीही पडून असल्याचं त्यांना आढळून आलं. कॅनडात उतरल्यानंतर बेपत्ता झालेली मरियम ही पहिली PIA कर्मचारी (Pakistani Air Lines) नाही. पीआयएची फ्लाइट अटेंडंट फैजा मुख्तार जानेवारीमध्ये कॅनडामध्ये बेपत्ता झाली होती. आता अवघ्या एक महिन्यानंतर पुन्हा मरियम बेपत्ता झाली आहे.

जानेवारी महिन्यातील घटना

फैजा मुख्तार कॅनडात उतरल्यानंतर एक दिवसानंतर पुन्हा कराचीला परतणार होती. पण ती परतली नाही. गेल्या वर्षी कॅनडात लँडिंग केल्यानंतर सात फ्लाइट अटेंडंट गायब झाले (Pakistani Air Hostess Missing From Canada) होते. याला कॅनडाचं उदारमतवादी निर्वासित धोरण जबाबदार असल्याचं पीआयएचे म्हणणं आहे. तर तज्ज्ञ म्हणतात की, कमी वेतन आणि एअरलाइनच्या भविष्याबद्दलची भीती कॅनडामध्ये उतरल्यानंतर क्रू मेंबर्सला परतण्याऐवजी पळून जाण्यास प्रवृत्त करत आहेत.

कॅनडामध्ये नागरिकता मिळवणं अगदीच सोपं आहे. यामुळं त्यांचा स्टाफ पाकिस्तानला पुन्हा परतण्यास इच्छुक दिसत नसल्याचं PIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT