8th Pay Commission :  Saam tv
देश विदेश

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याचा पगारात दुप्पट वाढ होणार?

8th Pay Commission update : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर हाती आलीये. ८ वा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. हा आयोग लागू झाल्यानंतर १ कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच पेन्शनधारकांची पेन्शनदेखील वाढणार आहे. ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेबाबत विलंब केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता ८ व्या वेतन आयोगामुळे पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर सध्याच्या २.५७ वरून २.८६ पर्यंत वाढवला जाऊ शकतो. यामुळे मूळ वेतन १८,००० रुपयांवरून सुमारे ५१,४८० रुपयांपर्यंत वाढू शकते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आयोगाच्या नव्याने नियुक्त सदस्यांकडून घेतला जाणार आहे. घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) यांसारख्या भत्त्यांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. एकाच वेतन ग्रेडमधील दोन कर्मचाऱ्यांचे भत्ते वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या एकूण पगारातही फरक दिसून येतो.

इतर लाभांमध्येही होणार बदल?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)आणि केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS) यांमध्ये मिळणाऱ्या लाभांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातून १०% योगदान राष्ट्रीय पेन्शन योजनेत दिलं जातं. तर सरकारकडून १४% योगदान दिलं जातं. आता या टक्केवारीतही बदल पाहायला मिळू शकतो. केंद्र सरकार आरोग्य योजनेसाठी सदस्यता दर वेतन श्रेणीशी निगडित आहे. त्यामुळे मूळ वेतन वाढल्यास केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणाचा पगार किती वाढणार?

ग्रेड 2000 (स्तर 3)

संभाव्य मूळ वेतन: 57,456 रुपये

एकूण वेतन: 74,845 रुपये

टेक-होम वेतन: 68,849 रुपये

ग्रेड 4200 (स्तर 6)

संभाव्य मूळ वेतन: 93,708 रुपये

एकूण वेतन: 1,19,789 रुपये

टेक-होम वेतन: 1,09,977 रुपये

ग्रेड 5400 (स्तर 9)

संभाव्य मूळ वेतन: 1,40,220 रुपये

एकूण वेतन: 1,81,073 रुपये

टेक-होम वेतन: 1,66,401 रुपये

ग्रेड 6600 (स्तर 11)

संभाव्य मूळ वेतन: 1,84,452 रुपये

एकूण वेतन: 2,35,920 रुपये

टेक-होम वेतन: 2,16,825 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT