Fitment Factor Update
Fitment Factor Update saam tv
देश विदेश

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, फिटमेंट फॅक्टरबाबत केंद्राची मोठी अपडेट

Chandrakant Jagtap

Fitment Factor Update : डीएनंतर आता मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारकडून येत असलेल्या या मोठ्या अपडेटची जोरात चर्चा सुरू आहे. या अपडेटनुसार सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. यामुळे मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सरकार फिटमेंट फॅक्टरवर विचार करत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आधीच उत्साह दिसत आहे. सरकारने याबाबत निर्णय घेतल्या झाल्यास 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपापूर्वी सरकारने महागाई भत्ता वाढवून एक भेट दिली आहे. सरकारने अद्याप डीएबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये मोठे दावे केले जात आहेत. (Latest Marathi News)

केंद्र सरकार लवकरच फिटमेंट फॅक्टरवर मोठी घोषणा करू शकते. त्यानंतर मूळ वेतनात वाढ अपरिहार्य मानली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.7 पट फिटमेंट फॅक्टर मिळते. परंतु आता ते 3.6 पट वाढवले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पगारात काही हजार रुपयांची मासिक वाढ होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात महिन्याला 8 हजार रुपयांची वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार दरवर्षी सुमारे 96 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तसेच मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत जाणार आहे.

डीएम किती टक्के झाली वाढ?

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की, केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता डीए वाढवून 42 टक्के करण्यात आला. यामुळे पगार दरमहा 720 रुपयांनी वाढणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

SCROLL FOR NEXT