Corona
Corona Saam Tv
देश विदेश

Corona New Variant : सावधान! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्र अन् कर्नाटकला सर्वधिक धोका?

Shivani Tichkule

Corona News : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशभरात मोठा हाहाकार माजला आहे. कोरोनाचा XBB.1.16 व्हेरिएंट कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. INSACOGने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरिएंची एकूण 76 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. या व्हेरिएंची सर्वाधिक प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहे. (Latest Marathi News)

कोणत्या राज्यात किती प्रकरणे?

या व्हेरिएंची 30 प्रकरणे कर्नाटकात, 29 महाराष्ट्रात, 7 पुडुचेरीमध्ये, 5 दिल्लीत, 2 तेलंगणात, 1 गुजरातमध्ये, 1 हिमाचल प्रदेशात आणि 1 ओडिशामध्ये आढळली आहेत. INSACOGच्या डेटानुसार, XBB.1.16 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जानेवारीमध्ये आढळून आला होता, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये एकूण 59 रुग्ण आढळून आढळले होते. मार्चमध्ये आतापर्यंत XBB.1.16चे एकूण 15 प्रकरणे आढळून आली आहेत. (Corona News)

126 दिवसांनंतर आणखी 800 रुग्ण आढळले

दरम्यान, भारतात शनिवारी तब्ब्ल 126 दिवसांनंतर एका दिवसात कोरोनाचे 800 हून अधिक रुग्ण आढळेल आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 चे (Corona) 843 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,46,94,349 झाली आहे. 

देशातील कोरोनाची स्थिती

गेल्या 24 तासांत झारखंड आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर केरळमध्ये दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 5,30,799 इतकी झाली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,839 आहे, जी एकूण संक्रमित संख्येच्या 0.01 टक्के आहे. त्याच वेळी, संसर्गातून बरे झालेल्यांचा दर 98.80 टक्के आहे. भारतात कोविड-19 चा पराभव करणाऱ्यांची एकूण संख्या 4,41,58,161 झाली आहे. त्याच वेळी, मृत्यू दर 1.19 टक्के असल्याचा अंदाज आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

GT vs RCB, IPL 2024: RCB साठी 'करो या मरो'ची लढत! विजयासाठी गुजरातने ठेवलं २०१ धावांचं आव्हान

SCROLL FOR NEXT