Pakistan Shocking News Saam Tv
देश विदेश

Pakistan Shocking News: अल्पवयीन मुलीचं तब्बल ७२ वर्षीय वृद्धासोबत लग्न;पाकिस्तानमधील धक्कादायक घटना

Shocking News: पाकिस्तानमधून एक धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. जिथे एका चारसद्दा शहरात १२ वर्षाच्या मुलीचे ७२ वर्षांच्या वृद्धाशी लग्न लावण्याचा प्रकार सुरु होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्या भागात बापानेच आपल्या १२ वर्षांच्या मुलीचे लग्न ७२ वर्षांच्या वृद्धाशी लावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांनी योग्य वेळी तिथे जाऊन लग्न थांबवले असून वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्या प्रातांत आरोपी वडील आलम सय्यद आपल्या १२ वर्षींय मुलीसह वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी आलमने आपल्या मुलीला पाच लाख रुपयांत ७२ वर्षीय वर हबीब खान यास विकले होते. यानंतर आलमने आपल्या मुलीचे लग्न हबीबशी लावण्याचा निर्णय घेतला.

लग्नाची(marriage) संपूर्ण तयारी करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर लग्नाच्या दिवशी पोलिसांनी मुलीच्या घरी धाव घेत वयोरुद्ध व्यक्तीला अटक केली आहे. मात्र आलम तिथून पळून गेला आहे. सध्या पोलिस आलम याचा शोध घेत असून आलम आणि हबीब विरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.

अनेक प्रकरणे

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान पोलिसांसमोर(Police) असेच प्रकरण समोर आले होते. जिथे एका १३ वर्षीच्या मुलीचे लग्न एका ७० वर्षीय व्यक्तीशी करण्यात येत होते. मात्र या प्रकरणातील मुलीच्या वडिलांचाही शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT