Andhra Pradesh Bus Accident ANI
देश विदेश

Andhra Pradesh Bus Accident: लग्न समारंभ आटपून घरी निघाले, वाटेतच मृत्यूने गाठले, भीषण अपघातामध्ये 7 वऱ्हाडींचा मृत्यू

Andhra Pradesh Police: लग्न समारंभ आटपून वऱ्हाडींची बस परत येत होती. त्याचदरम्यान दर्शनीजवळील सागर कालव्यात बस कोसळली.

Priya More

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) वऱ्हाडींच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नसमारंभ आटपून परतीचा प्रवास करणाऱ्या वऱ्हाडींची बस कालव्यात (Andhra Pradesh Bus Accident) कोसळली. या अपघातामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात बसला हा भीषण अपघात झाला. मध्यरात्री लग्न समारंभ आटपून वऱ्हाडींची बस परत येत होती. त्याचदरम्यान दर्शनीजवळील सागर कालव्यात बस कोसळली. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक वऱ्हाडी जण जखमी झाले. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

वऱ्हाडींची ही बस पोडिलीहून काकीनाडाकडे जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 ते 40 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडींनी काकीनाडा येथे जाण्यासाठी लग्नाच्या मंडळींनी आरटीसी बस भाड्याने घेतली होती. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामध्ये गावातील अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहाँ (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबिना (35), शेख हीना (6) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति आंध्रप्रदेच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रात असे म्हटले आहे की, 'मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT