Assam Accident
Assam Accident  Saam Tv
देश विदेश

Assam Accident News: आसाममध्ये कार-पिकअपचा भीषण अपघात, इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Priya More

Assam News: आसाममध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये (Assam Accident) 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथील जलुकबारी परिसरात रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Assam Police) सुरु आहे.

गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. रविवारी रात्री जलुकबारी उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात आसाम इंजिनिअरिंग कॉलेजच्या (AEC) सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी कारमधून प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या भरधाव कारने जळुकबारी उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार डिव्हायडरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.

या कारमधून इंजिनिअरिंगचे दहा विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातामध्ये दहापैकी सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच) उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात गुवाहाटी येथील अरिंदम भवाळ आणि निओर डेका, शिवसागर येथील कौशिक मोहन, नागाव येथील उपांगशु सरमाह, माजुली येथील राज किरण भुईया, दिब्रुगढ येथील इमोन बरुआ आणि मंगलदोई येथील कौशिक बरुआ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Today's Marathi News Live : इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत शरद पवारांनी दम भरला

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

SCROLL FOR NEXT