Crime News saam tv
देश विदेश

मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा असा झाला उलगडा

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bengaluru Crime News : बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात जेपी नगर भागात रस्त्याच्या कडेला एका 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला होता. याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा झाला आहे. या व्यक्तचा मृत्यू कसा झाला यावरून जेव्हा पोलिसांनी (Police) पडदा हटवला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना या व्यक्तीचा मृत्यू हर्ट अटॅकने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर मोलकरणच्या पती आणि भावाने ६७ वर्षीय व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे.

असा झाला घटनेचा उलगडा

गेल्या काही वर्षांपासून ६७ वर्षीय व्यावसायिकाचे मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. मोलकरणीच्या घरी कुणी नसताना ते अनेकदा तिथे जात होते. नेहमीप्रमाणे यावेळीही मोलकरणीच्या घरी कुणी नसल्याने ते तिच्या घरी गेले होते. मात्र यावेळी शरीरसंबंध ठेवताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे जागीच निधन झाले.

त्यानंतर काय करावे, हे मोलकरणीला समजत नव्हते. तिने पती आणि तिच्या भावाला संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी व्यावसायिकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगर येथील निर्जन भागात फेकून दिला. दरम्यन, पोलिसांनी सर्व चौकशी केली असता मोलकरणीने वस्तूस्थितीची कल्पना देत सत्य परिस्थिती सर्वाना सांगितली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग' कोहलीला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला, "विराट स्वतःशीच लढाई थांबवेल तेव्हाच..."

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

SCROLL FOR NEXT