Saam Tv ANi
देश विदेश

Jharkhand Accident: दसऱ्याच्या दिवशी कुटुंबावर काळाचा घाला, कार कालव्यात कोसळून ५ जण जागीच ठार

Priya More

Jharkhand Car Accident:

दसऱ्याच्या (Dasara 2023) आनंदात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या (Jharkhand Car Accident) देवघरमध्ये कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास झारखंड पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार पुलावरून थेट कालव्यामध्ये कोसळली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी कार कालव्याबाहेर काढली. या अपघाामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातग्रस्त कारमधून एकाच कुटुंबातील ५ जण प्रवास करत होते. हे सर्वजण गिरीडीहवरून आसनसोलला जात होते. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. पुलावरील संरक्षण भिंत तोडत कार कालव्यामध्ये कोसळली. या घटनेनंतर झारखंडच्या चित्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण एकचा कुटुंबातील आहेत. मुलाचे विधी पूर्ण करून हे कुटुंब सासरच्या घरातून गिरीडीह येथील घराकडे जात होते. घरी पोहचण्यापूर्वी काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातामध्ये ५ ही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT