Bihar Purnia killing Case saam tv
देश विदेश

Shocking News : महिला चेटकीण असल्याचा संशय; अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या

Bihar Purnia News : अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात हे हत्याकांड घडलंय.

Nandkumar Joshi

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. महिलेवर चेटकीण असल्याचा संशय घेत एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून लपवण्यात आले. या घटनेनं बिहार हादरले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे.

अंधश्रद्धेचं भूत मानगुटीवर बसलं की ते सुखी कुटुंबाला उद्ध्वस्त करतं. अशीच एक भयंकर घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेच्या संशयाचं भूत मानगुटीवर बसलेल्या जमावानं एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. त्यांचे मृतदेह जाळून ते दडवले गेले. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे.

मुसफ्फिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेटागामा गावात ही हादरवून टाकणारी घटना घडलीय. या हत्याकांडामागे संपूर्ण गावाचा हात असल्याचा आरोप मृत कुटुंबाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. चार मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. या हत्याकांडामागे चार मुख्य आरोपी असून, त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे. मात्र, यावर गावातील कुणीही बोलण्यास तयार नाही. एफएसएलचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. मृतांमध्ये बाबूलाल उराव, पत्नी सीता देवी, आई मो कातो, सून रानी देवी आणि मुलगा मनजीत कुमार यांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून, स्वतः पोलीस अधीक्षक स्वीटी सेहरावत या घटनास्थळी पोहोचल्या. मुफ्फसिल पोलीस ठाण्याचे प्रभारी उत्तम कुमार यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

गावातील २५० लोकांनी घेरून पाच जणांना निर्दयीपणे संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील महिला चेटकीण असल्याचा संशय गावकऱ्यांना होता. जवळपास २५० लोकांच्या जमावानं त्या महिलेच्या कुटुंबातील पाच जणांना घेरून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून गायब केले. या घटनेच्या तपासासाठी एफएसएल आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी एका मांत्रिकालाही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुहूर्त ठरला! 'Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2' प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज, वेळ अन् तारीख काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अकरावीच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी १७ जुलैला होणार जाहीर

8th Pay Commission : सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगात बेसिक पगारातच येणार महागाई भत्ता, या ३ अलाऊन्समध्येही वाढ?

क्षणात सगळं संपलं! घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकल्याला ऑटोने चिरडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Horoscope : हाती येईल पैसा मात्र 'ही' एक गोष्ट टाळा, वाचा आजचे राशी

SCROLL FOR NEXT