Bihar Crime Saam Tv
देश विदेश

हद्दच झाली! ३५ वर्षीय विवाहित महिलेचं अल्पवयीन मुलावर जडलं प्रेम; घरी बोलावून केलं धक्कादायक कृत्य

महिलेच्या पतीने दोघांनाही नको त्या अवस्थेत पकडलं.

साम टिव्ही ब्युरो

जमुई : प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात जात पात वर्ण तसेच वय बघितलं जात नाही. प्रेम करणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाहीये. प्रेमासाठी माणूस वाट्टेल ते करतो. अशीच एक प्रेमकहाणी बिहारच्या (Bihar) जमुईमधून समोर आली आहे. इथे एका अकरावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाचं 35 वर्षीय महिलेवर (Women) प्रेम जडलं. इतकंच नाही तर, तो सदरील महिलेला भेटायला तिच्या घरी देखील गेला. मात्र त्यानंतर जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल. (Bihar Crime News)

बिहारमधील जहानाबाद येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाची जमुई येथील 35 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली. हाय हॅलो म्हणत दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. त्यानंतर मैत्रीही झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की, दोघांनीही एकमेकांना भेटण्याची इच्छा दर्शवली.

त्यानंतर सदरील अल्पवयीन मुलगा त्याच्या 35 वर्षीय प्रेयसीला भेटण्यासाठी जेहानाबादहून जमुईला गेला. तिथे पोहचल्यानंतर महिलेनं त्याला घरी बोलावून घेतलं. आपला माहेरचा पाहुणा आहे असं सांगत तिने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींचा विश्वासही जिंकला. पण दोन ते तीन दिवस उलटल्यानंतर महिलेच्या पतीने दोघांनाही नको त्या अवस्थेत पकडलं.

पती कामावर गेला असताना महिलेनं आपल्या 15 वर्षीय प्रियकरासोबत शारीरिक संबध ठेवण्यास सुरूवात केली. यादरम्यान, सासरच्या मंडळींचं सुद्धा तिच्यावर लक्ष नव्हतं. पण एकेदिवशी महिलेचा पती कामावरून लवकर घरी पोहचला. त्यावेळी त्याने आपल्या पत्नीला 15 वर्षीय मुलासोबत नको त्या अवस्थेत बघितलं. या सर्व प्रकारानंतर महिलेच्या पतीने दोघांनाही बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

दरम्यान, पोलिसांनी दोघांचीही समजूत काढली. आणि अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांना जमुई येथे बोलावून घेतलं. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी जमुई गाठले आणि ते मुलाला जहानाबादला घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांनी महिलेच्या पतीची देखील समजूत काढली. 35 वर्षीय महिलेला दोन मुलं सुद्धा असल्याचं समजतं आहे. याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardeek Joshi-Akshaya Deodhar : राणादा अन् पाठकबाईंनी दिली गुडन्यूज, घरात आला नवा सदस्य

ऐन दिवाळीत नागपुरमध्ये अग्नितांडव, जिओ मार्केटसह १० ठिकाणी आगीचा भडका; पाहा VIDEO

Pune News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात राडा, सारसबागमध्ये दोन गट भिडले; VIDEO व्हायरल

Deepika- Ranveer Daughter: अहाहा! किती गोड दिसतेय, रणवीर आणि दिपिकाची मुलगी, फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

SCROLL FOR NEXT