Bike Stunt Viral Video Saam Tv
देश विदेश

Video: बाईक स्टंट करणं तिघांना पडलं महागात, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल!

New Delhi News : सोशल मीडियावर काही तरुणांचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bike Stunt Viral Video: सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी एखादा व्हिडिओ असो वा फोटो तो व्हायरल झाल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होणाऱ्या या प्रत्येक गोष्टींची चर्चा होते. तरुणांना बाईक राइड करण्याची प्रचंड आवड असते. पण बऱ्याचदा बाईक राइड करताना स्टंट देखील केला जातो. अशावेळी हे तरुण आपल्यासोबत इतरांचा देखील जीव धोक्यात घालतात.

सध्या सोशल मीडियावर काही तरुणांचा बाईक स्टंट करतानाचा व्हिडिओ (Bike Stunt Video) तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तिघे मित्र जीवघेणा बाईक स्टंट करताना दिसत आहेत. भर रस्त्यात बाईक स्टंट करताना त्यांना कोणतीही भीती वाटत नसल्याचे दिसत आहे. स्टाईलमध्ये बाईक स्टंट करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि होत्याचं नव्हतं झालं.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तिघे मित्र एकचा बाईकवर बसून स्टंट करत आहेत. रस्त्यावर आडवी- तिडवी करुन ते बाईक चालवत आहेत. पण अचानक रिक्षामध्ये येते आणि बाईक स्टंट करताना त्यांचा तोल जातो. या तरुणांची बाईक थेट भिंतीला जाऊन जोरात धडकते. यामधील एका तरुण खाली पडतो. तर या अपघातामध्ये इतर दोघांना चांगलीच दुखापत झाल्याचे दिसून येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. mkalimani_og नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) हा बाईक स्टंटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 46 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पण या तरुणांचा कॉन्फिडन्स पाहून तुम्हाला हसायला देखील येईल. नेटिझिन्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स करत आहेत. काहिंनी या व्हिडिओवरर हसण्याचे स्माईली पोस्ट केले आहेत. मुळात तरुणांनी असा जीवघेणा बाईक स्टंट करु नये असे वारंवार आवाहन पोलिसांकडून केले जाते. तरी देखील काही तरुण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्यासोबत इतरांचा देखील जीव धोक्यात घालतात.

Edited By - Priya More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT