covid-19 
देश विदेश

JNV तील नववी, दहावीतील २९ विद्यार्थी काेराेनाबाधित

शिक्षकांची देखील कोविड-१९ ची चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगाल : नादिया जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय (jnv) या निवासी शाळेतील २९ विद्यार्थ्यांना काेराेनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने त्यांची काेराेनाची चाचणी केल्यानंतर २९ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.

कोविड-19 (covid19) पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांना (students) खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम क्वारंटाइन (home quarantine) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कल्याणी, हिरक मंडळ यांनी शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची देखील कोविड-१९ ची चाचणी करण्यास प्रारंभ केला आहे.

कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील नववी आणि दहावीतील २९ विद्यार्थ्यांना काेराेनाची लागण झाल्याची माहिती पुढं आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने सर्वांना दिलासा दिला. संबंधित सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवून त्यांना त्यांच्या घरी परत नेण्याची सूचना केल्याचे व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT