फतेहपूर,उत्तर प्रदेश: भारतात वाहतूकीसाठी कायदे भरपूर आणि कडक आहेत, पण किती लोकं वाहतूकीचे नियम पाळतात हे सर्वांनाच माहिती आहे. दुचाकीवर २ जण बसायची परवानगी असताना सर्रासपणे ३ ते ४ जण दुचाकीवर बसतात. रिक्षेत ३ सीट्सची परवानगी असताना ४,५, किंवा ६ प्रवाशांना दाबून बसवलं जातं. पण आता उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एका घटनेनं हे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. एका रिक्षेतून (Auto Rickshaw) १० नाही, २० नाही, २५ नाही तर तब्बल २७ जण प्रवास करताना आढळले आहेत. विशेष म्हणजे २७ जण बसलेले असतानाही ही रिक्षा मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत होती, त्यामुळे रिक्षा थांबवण्यासाठी पोलिसांनी रिक्षेचा पाठलाग केला आणि रिक्षेला थांबवले असता त्यांना हा प्रकार समजला. (27 peoples in one Auto Viral Video)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातल्या बिंदकी कोतवाली परिसरात काही लोक विक्रमऑटो रिक्षाने निघाले होते. बिंदकी परिसरातील लालौली चौकात चालक भरधाव वेगाने रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी रिक्षा थांबवली आणि मग एक एक करून लहान मुले आणि मोठे अशा सर्वांनाच रिक्षेतून खाली उतरवलं. यावेळी पोलिसांनी मोजणी केली असता चालकासह एकूण २७ जण ऑटो रिक्षेतून बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत ही रिक्षा जप्त केली आहे.
जेव्हा पोलिस सर्वांना एकामागून एक रिक्षेतून खाली उतरवत होते तेव्हा कोणीतरी हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केल्यावर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल (Viral Video) झाला. तीन चाकी वाहनात व्यक्ती २७ जण कसे बसू शकतात? हे लोकांना समजत नाहीए. एका यूजरने ट्विटरवर कमेंट केली की, "ही कला फक्त भारतीयांमध्येच आहे" तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, "हा न्यू इंडिया आहे." तर काहींनी गंमतीत लिहिलंय की ते संपूर्ण 'नगर' वाहून नेत आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.