25-Year-Old Gujarat Bank Employee killed herself Saam Tv News
देश विदेश

'आई-बाबा, माझा मृतदेह घरी आणल्यावर मला मिठीत घ्या..' तरूणीनं बँकेतच आयुष्य संपवलं; चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

Ends Life Over ₹28 Lakh Loan: गुजरातच्या अमरेलीतील २५ वर्षीय भूमिका सोरठियाने shine.com च्या ऑनलाईन टास्क स्कॅममुळे २८ लाखांचं कर्ज होऊन आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटने खळबळ उडवली आहे.

Bhagyashree Kamble

खासगी बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेनं ऑनलाईन टास्क स्कॅमला बळी पडून आत्महत्या केली आहे. तिनं बँकेच्या आवारातच कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं. ही तरूणी गुजरात अमरेली येथील रहिवासी होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं सुसाईड नोट लिहिली. त्या सुसाईड नोटमध्ये तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. तसेच आई वडिलांसाठी भावनिक मेसेज लिहिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बँकेच्या आवारातच कीटनाशक प्यायली

भुमिका सोरठिया (वय वर्ष २५) असे मृत तरूणीचं नाव आहे. आयआयएफएल या खासगी बँकेत ती कार्यरत होती. काही महिन्यांपूर्वी ती एका ऑनलाईन टास्क स्कॅमला बळी पडली. यात तिला २८ लाख रूपयांचा फटका बसला. यामुळे तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या आवारातच तिनं कीटनाशक पिऊन स्वत:ला संपवलं. यानंतर तिला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

डोक्यावर २८ लाख रूपयांचं कर्ज

घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट सापडली. त्यात तिनं आयुष्य संपवण्यामागचं कारण स्पष्ट केलं. 'मी आत्महत्या करत आहे. माझ्या डोक्यावर २८ लाख रूपयांचं कर्ज आहे. जे मी फेडू शकत नाही, म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. आई वडिलांनी सुखी जीवन जगावे, या पद्धतीनं मी प्लॅन आखत होते. मात्र, सर्व काही उलटे झाले. हे सर्व कर्ज शाईन. कॉम कंपनीचे आहे. शक्य असल्यास, मृत्यूनंतर पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करा', असं तिनं आपल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

आई बाबांना भावनिक संदेश

तिनं चिठ्ठीतून पालकांना आयआयएफएल बँकेतून ५ लाख रूपये घेण्यास सांगितले आहे. तसेच जमा झालेल्या पीएफची रक्कम काढण्यासही सांगितलं. तरूणीनं चिठ्ठीतून शेवटची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे. 'आई-बाबा माझी मृतदेह घरी आल्यावर, मला एकदा मिठी मारा.. कृपया ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा..' असं तिनं म्हटलंय.

स्कॅमला बळी पडली, अन् आयुष्याचा शेवट

खांभा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे. प्राथमिक तपासात भूमिका टेलिग्रामवरून चालणाऱ्या ऑनलाईन टास्क स्कॅममध्ये अडकली होती. या स्कॅममध्ये ५०० रुपये दिल्यानंतर ७०० रूपये मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरूवातीला लहान रक्कम मिळाली होती. त्यामुळे तिनं या स्कॅमवर विश्वास ठेवला. मात्र, ती यात अडकत गेली. त्यामुळे तिच्या डोक्यावर २८ लाखांचं कर्ज निर्माण झालं.

एएसपी जयवीर गढवी यांनी सांगितले की, तपासात एका टेलिग्राम आयडीची ओळख पटली असून संबंधित खात्यावर लक्ष ठेवले जात आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT