indian Student jasmeen kaur kidnapped and buried Alive by her Ex Boyfriend/Twitter SAAM TV
देश विदेश

Crime Story : ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; एक्स बॉयफ्रेंडनं अपहरण करून ६५० किमी दूर नेलं, जिवंत पुरलं

Crime News in Marathi : ऑस्ट्रेलियात मन सुन्न करणाऱ्या घटनेचा उलगडा झाला आहे. भारतीय विद्यार्थिनीची तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं निर्घृण हत्या केली.

ब्युरो रिपोर्ट, सामटीव्ही

Jasmeen kaur Killed In Australia : ऑस्ट्रेलियातील एका हत्येच्या घटनेनं अवघं जग हादरून गेलं आहे. एका २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीची तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं निर्घृण हत्या केली. जसमिन कौर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. आरोपीनं तिचं अपहरण केलं. कारमधून जवळपास ६५० किलोमीटरवर नेऊन एका निर्जनस्थळी जिवंत पुरलं. प्रेमसंबंधांना नकार दिला म्हणून सूडभावनेतून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.

वृत्तानुसार, तारिकज्योत सिंग यानं मार्च २०२१ मध्ये जसमिन कौरची हत्या केली. ती ज्या ठिकाणी काम करत होती, तेथून ५ मार्च २०२१ रोजी तिचं अपहरण केलं. तिच्या डोळ्यांवर पट्टी आणि तिचे हातपाय बांधले होते. तिला कारच्या डिगीमध्ये कोंबलं. तिला जवळपास ६४४ किलोमीटरवर घेऊन गेला. ही कार त्यानं रूम पार्टनरकडून घेतली होती. तिथे नेल्यानंतर त्याने तिला एका खड्ड्यात जिवंत पुरलं. (Crime News In Marathi)

या हत्या प्रकरणात तारिकज्योतला दोषी ठरवलं गेलं. मात्र, या प्रकरणाचा उलगडा सुप्रीम कोर्टातील (Court News) सुनावणीदरम्यान झाला. वकील कारमेन माटेओ म्हणाले की, हे कृत्य साधारण नाही. जसमिनला खूप त्रास झाला असावा. जेव्हा तिला मातीत पुरले, तेव्हा तिच्या तोंडात माती गेली असावी आणि तिला श्वास घेण्यास त्रास झाला असावा. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या सुनावणीला जसमिनच्या आईसह तिचं कुटुंब उपस्थि होतं. जसमिननं प्रेमसंबंधांना नकार दिला होता. त्यामुळे त्याने सूडभावनेने तिची हत्या केली, असे कोर्टात सांगण्यात आले.

तारिकज्योतने जसमिनला अनेक धमकी देणारे मेसेज पाठवले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. तारिकज्योतने सर्व आरोप फेटाळले होते. जसमिननं आत्महत्या केली. तिचा मृतदेह पुरला, असे त्याने सांगितले होते. मात्र, यावर्षाच्या सुरुवातीला खटला सुरू होण्याआधीच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

आरोपीने पोलीस (Police) अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेले. तेथे तरुणीचे शूज, चष्मा आणि ज्या ठिकाणी काम करत होती, ते ओळखपत्र एका कचराकुंडीत सापडले होते. तर हत्येच्या काही तास आधी एका दुकानातून केबल, फावडा खरेदी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी तारिकज्योतला शिक्षेत सूट देण्यात यावी, अशी विनंती त्याच्या वकिलांनी कोर्टात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT