येमेनमध्ये हवाई हल्ल्यात २१ जण ठार ! Representational Image
देश विदेश

येमेनमध्ये हवाई हल्ल्यात २१ जण ठार !

सौदीच्या गटाने केलेल्या हवाई हल्ल्यात मध्य येमेन प्रांतातील अल-बायदा (Al Byda) येथे २१ बंडखोर ठार झाले आहेत.

वृत्तसंस्था

सौदीच्या गटाने केलेल्या हवाई हल्ल्यात मध्य येमेन प्रांतातील अल-बायदा (Al Byda) येथे २१ बंडखोर ठार झाले आहेत. अल-बायदा परिसर या बंडखोरांचा बालेकिल्ला आहे. बंडखोरांच्या येथील ठिकाणांना लक्ष्य करत सौदीने काल रात्री हा हवाई हल्ला घडवला आहे. या हवाई हल्ल्यामध्ये २१ हौथी बंडखोर (houthi rebels) मारले गेले आहेत. एकूण पाच हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

२०१४ सालापासून येमेनमध्ये गृहयुद्धाचा भडका उडाला आहे. हौथी बंडखोरांनी येमेनची राजधानी साना (Sanaa) सह येमेन मधील अनेक प्रांतांवर कब्जा केला आहे. यातूनच येमेन देशात संघर्ष सुरु आहे. इराणचे समर्थक असणाऱ्या या हौथी बंडखोरांच्या येमेनमधील नाटी (Nati) जिल्ह्यातील अनेक तळांवर हवाई हल्ले चढवले आहेत. हा भाग इराण-समर्थित अतिरेकी गटाच्या ताब्यात आहे.

या हल्ल्यांमध्ये २१ जण ठार झाले असून १३ बंडखोर जखमी झाले आहेत. येमेनमधील नागरिकांची परिस्थिती फार भयानक होत चालली आहे. संयुक्त राष्ट्राने या संघर्षाचे वर्णन जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकट असे केले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच येमेनचे पंतप्रधान अब्दुलमलिक सईद यांनी आंतरराष्ट्रीय पाठिंबा नसल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे पूर्णपणे पतन होण्याचा इशारा दिला आहे.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT