यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे देशभरात पावसाची सरासरी कमी राहण्याचा अंदाज आहे. खाजगी हवामान संस्था स्कायमेट आणि इतर हवामान अंदाजांनुसार सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच अल निनोबद्दल ब्रिटनच्या हवामान विभागाकडून भारताला मोठा इशारा देण्यात आला.
2027 मध्ये अल निनोचा कहर होणार आहे. प्रशांत महासागरात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, तापमान सामान्यहून 3 डिग्रीपर्यंत वाढेल. ज्यामुळे भारतातील पिकांवर गंभीर परिणाम होईल. मागच्या 100 वर्षात लोकांनी अल निनोचा जसा प्रभाव बघितला नाही
2024 मध्ये तापमान प्रचंड वाढलं होतं. आयएमडीच्या हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार 2027 मध्ये त्यापेक्षाही धक्कादायक स्थिती असेल. अल निनोचा परिणाम मॉन्सूनवर बघायला मिळतोय. सामान्यपणे 90 टक्के पाऊस होतो. मात्र, मागच्या 11 वर्षांचा विचार करता, यंदा पाऊस कमी आहे. पुढच्या वर्षीही याही पेक्षा भीषण स्थिती होणार असल्याने शेतकरी संकटात येऊ शकतो. ज्यामुळे महागाईमध्ये मोठी वाढ होऊ शकते. फक्त भारतावरच नाही तर या अल निनोचा जगावर परिणाम होणार असल्याच हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे या संकटाला सामोरं जाताना आत्तापासूनच काय उपाययोजना आखल्या जातायेत ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.