condom Saam tv
देश विदेश

200 year Old Condom : मेंढ्याच्या आतड्याने बनलेला अन् २०० वर्षे जुना 'लक्झरी कंडोम' अचानक चर्चेत; काय आहे खासियत?

Dutch museum latest News : मेंढ्याच्या आतड्याने बनलेला आणि २०० वर्षे जुना 'लक्झरी कंडोम' अचानक चर्चेत आला आहे. या कंडोमची काय खासियत आहे, जाणून घ्या.

Saam Tv

मेंढ्याच्या आतड्यांपासून बनवलेला २०० वर्षांपूर्वीचा कंडोम सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. नेदरलँडमधील संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेला हा दुर्मीळ कंडोम नन आणि पाद्रींच्या कामुक नक्षीकामांसह सादर करण्यात आला आहे. हा कंडोम गर्भनिरोधक इतिहासातील एक महत्त्वाचा आणि दुर्मीळ नमुना मानला जातो. या संग्रहालयात इतिहास, कला आणि लैंगिक शिक्षणाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. येथे लोकांना लैंगिक इतिहास, समाजाची नैतिकता आणि कलेचा सामाजिक प्रभाव समजून घेण्याची संधी मिळते.

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, हा कंडोम इसवी सन 1830 च्या सुमारास तयार करण्यात आला आहे. तो पॅरिसमधील एका उच्चभ्रू वेश्यालयातून आणला गेला असल्याचे मानले जाते. यावर एका नग्न नन आणि तीन पाद्रींचे कामुक नक्षीकाम करण्यात आले आहे. यामुळे हा कंडोम केवळ गर्भनिरोधक नसून, एक व्यंग्यात्मक कलाकृती देखील ठरतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हा २० सेंटीमीटर लांब कंडोम हार्लेममधील एका लिलावात विकत घेण्यात आला होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये, तो सुमारे ९०,००० ते ९२,००० भारतीय रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला. सध्या तो काचेत बंद ठेवण्यात आला आहे. हा कंडोम संपूर्ण प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण केंद्र ठरला आहे. या प्रदर्शनात डच आणि फ्रेंच कलाकारांच्या लैंगिक आरोग्य व कामुकतेशी संबंधित चित्रे आणि छायाचित्रे देखील सामील आहेत.

इसवी सन 1839 मध्ये वल्कनाइज्ड रबरचा शोध लागण्यापूर्वी, कंडोम तयार करणे ही एक प्रकारची हस्तकला मानली जात होती. त्या काळात प्राण्यांच्या झिल्ली, लिनन आणि अगदी कासवाच्या कवचाचा सुद्धा गर्भनिरोधक म्हणून वापर केला जायचा. याचा उपयोग लैंगिक रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि गर्भधारणा टाळण्यासाठी केला जात असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT