Himachal Pradesh And Delhi Police Clash Congress Protest Saam Tv
देश विदेश

AI Summit Protest : २० पोलिसांना मध्यरात्री बेड्या, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल, २ राज्यातील बडे अधिकारी का भिडले?

Himachal Pradesh And Delhi Police Clash Congress Protest : इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर दिल्ली आणि हिमाचल पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल होऊन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Alisha Khedekar

  • एआय समिटमध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन आणि अटक

  • दिल्ली–हिमाचल पोलिसांमध्ये कारवाईवरून वाद

  • दिल्ली पोलिसांविरोधात एफआयआर दाखल, प्रकरण न्यायालयात

  • अटकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

दिल्लीत सुरु असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये अर्धनग्न होऊन आंदोलन करणाऱ्या तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. याप्रकरणानंतर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली पोलिसांमध्ये संघर्ष झाला. दिल्ली पोलिसांनी हिमाचल पोलिसांना माहिती न देता गुप्तपणे कारवाई केल्याने हा वाद चिघळला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काँग्रेसने याला केंद्र सरकारची गुंडगिरी म्हटले आहे.

याप्रकरणी हिमाचल पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने जिल्हा न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक २ मध्ये याचिका दाखल केली. न्यायालयीन सुनावणीनंतर, दिल्ली पोलिस आता प्रक्रिया पूर्ण करत आहेत. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. दरम्यान शिमला पोलिसांनी चिदगाव पोलिस ठाण्यात दिल्ली पोलिसांच्या पथकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

हिमाचल पोलिसांना माहिती न देता दिल्ली पोलिसांनी रोहरू येथून तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. काँग्रेसने याला केंद्र सरकारची गुंडगिरी म्हटले आहे, तर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष विनय कुमार यांनी केंद्र सरकारला शांततापूर्ण हिमाचलमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्याविरुद्ध इशारा दिला आहे. ते म्हणाले की हिमाचल हे एक पर्यटन स्थळ आहे आणि आमच्या पाहुण्यांचा अनादर सहन केला जाऊ शकत नाही. विनय कुमार यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात, रोहरू येथून तीन युवक काँग्रेस नेत्यांना बेकायदेशीरपणे अटक करून दिल्लीला नेण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinch Sarbat Recipe : उन्हाळ्यात लिंबूपाणी कशाला? झटपट बनवा आंबट-गोड चिंचेचा सरबत, वाचा रेसिपी

Viral Video : मोठा राडा झाला! नवरा बाहेरगावी, बायको बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत; त्याचवेळी गावकरी धडकले? नेमकं काय घडलं?

IPL 2026 : ऋषभ पंतच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा हादरा; चॅम्पियन खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Crime News: घरमालकाने दरवाजा ठोठावला; ओळखीचा म्हणून विद्यार्थिनीनं दरवाजा उघडला, पण नंतर जे घडलं त्यानं सर्वच हादरले

Maharashtra News Live Update: जळगाव नेहरू नगरातील सांदीपनी बॉईज हॉस्टेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT