वृत्तसंस्था: जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे मित्रीगाम परिसरात काल दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक सुरू झाली, या चकमकीमध्ये १ दहशतवादी (Terrorist) मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार की, पुलवामाच्या (Pulwama) मित्रीगाम परिसरात सुरू असलेल्या चकमकीत आणखी १ दहशतवादी मारला गेला आहे. आतापर्यंत एकूण २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २ AK-४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. (Pulwama Encounter Latest Marathi News)
हे देखील पाहा-
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीमध्ये आणखी १ दहशतवादी मारला गेला आहे. स्थानिक दहशतवादी एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी ठार झालेल्या २ दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांकडून २ AK-४७ रायफल जप्त करण्यात आल्या. हे २ दहशतवादी अल बद्रे संघटनेचे होते. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार म्हणाले की, चकमकीत ठार झालेले २ दहशतवादी मार्च- एप्रिल २०२२ या महिन्यात जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या मजुरांवर करण्यात आलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्यांचा हात होते.
विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याबरोबर २-३ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्याने ही कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली. या अगोदर २४ एप्रिलदिवशी, जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत प्रतिबंधित संघटना लष्कर- ए- तैयबाच्या डेप्युटी कमांडरसह ३ दहशतवादी मारले गेले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. आरिफ अहमद हजार उर्फ रेहान आणि अबू हुजैफा उर्फ हक्कानी व श्रीनगरमधील खानयार येथील नथीश वानी उर्फ हैदर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.