धावत्या बसमध्येच 2 महिलांची प्रसुती; परिवहन मंडळाकडुन मुलींना आयुष्यभराची भेट Saam Tv
देश विदेश

धावत्या बसमध्येच 2 महिलांची प्रसुती; परिवहन मंडळाकडुन मुलींना आयुष्यभराची भेट

बसमध्ये प्रवास करत असताना दोघींचीही बसमध्येच प्रसूती झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : गर्भवती महिलाकरिता (Pregnant women) प्रवास करणे ही काही जिकरीची गोष्ट आहे. तरीदेखील कधी अशी परिस्थिती तयार होते की एखाद्या गर्भवती महिलेला प्रवास करावाच लागत असतो. तेलंगणामध्ये (Telangana) २ वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या रहिवासी असलेल्या २ गर्भवती महिलांना देखील काही कारणास्तव राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करावे लागले आहे. बसमध्ये प्रवास करत असताना दोघींचीही बसमध्येच प्रसूती झाली आहे. दोघींनी २ गोंडस मुलींना जन्म दिला आहे.

बसमध्ये जन्मलेल्या (Bus) या दोन्ही मुलींना तेलंगणा राज्य परिवहन मंडळातर्फे एक अनोखी भेट यावेळी देण्यात आली आहे. दोन्ही मुलींना टीएसआरटीसीच्या बसमधून आयुष्यभर मोफत प्रवास (Free travel) करता येणार आहे. टीएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार यांनी याविषयी माहिती दिली आहे. मुलींना दिलेल्या या पासमध्ये आंतरराज्यीय बस आणि विमानतळ विशेष बस यासारख्या सर्व प्रकारच्या बस सेवांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. (2 girl child born on state run buses telangana both get lifetime free travel passes)

हे देखील पहा-

राज्य परिवहन मंडळाचा आजीवन पास मिळालेल्या या २ मुलींपैकी एकीचा जन्म, ३० नोव्हेंबर दिवशी तर महबूबनगर जिल्ह्यामधील पेड्डाकोतापल्ली गावाजवळ (Peddakothapally Village) चालत्या बसमध्येच झाला होता. तर, दुसऱ्या मुलीचा जन्म २ दिवसांपूर्वी म्हणजे ७ डिसेंबर 2021 ला सिद्धीपेट (Siddipet) जिल्ह्याजवळ झाला आहे. मुलींचा जन्म बसमध्ये झाल्याने त्यांना आजीवन पास देण्याचा निर्णय टीएसआरटीसीने यावेळी घेतला आहे.

व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार (VC Sajjanar) यांनी याविषयी एक ट्विटही देखील केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी दोन्ही मुलींच्या जन्माची माहिती येथे दिली आहे. बसमध्ये प्रसूती झालेल्या दोन्ही महिला टीएसआरटीसीच्या नियमित प्रवासी आहेत. प्रवासादरम्यान दोघींना प्रसूती वेदना सुरू झाले होते. टीएसआरटीसी स्टाफने (TSRTC staff) सहप्रवाशांच्या मदतीने या महिलांची सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे.

त्यानंतर जवळच्या शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून या महिलांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोन्ही महिला आणि नवजात मुलींची प्रकृती आता सध्या ठणठणीत असल्याचे, समजत आहे. तेलंगणा राज्यामध्ये राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी सेवा देण्याचे काम टीएसआरटीसी करते. या बससेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आपल्या वाहनातून प्रवास करत असताना २ मुलींचा सुखरूप जन्म झाला आहे, यामुळे टीएसआरटीसीने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या या पासमुळे दोन्ही मुलींना आता बसने आजीवन मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक स्तरातुन कौतुक केले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT