Russia-Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेले १८२ विद्यार्थी मुंबईत दाखल

युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या (Air India) विशेष विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

वृत्तसंस्था: युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या (Air India) विशेष विमान मुंबईमध्ये (Mumbai ) दाखल झाले आहे. बुखारेस्ट, रोमानिया (Romania) येथील भारतीय (Indian) विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. विद्यार्थ्यांचे (students) स्वागत करण्याकरिता मंत्री नारायण राणे (Narayan Rane) विमानतळावर पोहोचले आहेत.

हे देखील पहा-

युक्रेनमध्ये (Ukraine ) अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याकरिता केंद्र सरकारने (government) एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन मधून घेऊन परतणारे हे ७ विमान आहे. एअर इंडियाचे विमान IX१२०२ मुंबई विमानतळावर (airport) पोहोचल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांकरिता सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनच्या बुखारेस्ट मधून एअर इंडियाच्या ८ आणि ९ विमानाने देखील उड्डाण केले आहे. २१८ भारतीयांना घेऊन हे विमान दिल्लीला रवाना झाले आहे. मंगळवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे ९ वा विमान उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'सगेसोयरे' जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळ्यात ओबीसी संघटना आक्रमक

Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर गॅझेटची आरक्षणाच्या लढाईत एन्ट्री; मराठा-कुणबी समाज एकच असल्याचा ऐतिहासिक उल्लेख|VIDEO

Akola Gangwar : अकोल्यात पोलिसांची मोठी कारवाई; गॅंगवॉर प्रकरणातील १७ गुन्हेगारांवर मकोका

Urmila Matondkar: 'रंगीला'ला ३० वर्षे! ५१ वर्षाच्या उर्मिलाने रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला रे' म्हणत केला जल्लोष

SCROLL FOR NEXT