Dubai News Saam Tv
देश विदेश

Indian Student News : दिवाळी साजरी करताना धाडकन खाली कोसळला, दुबईत १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Dubai News : दिवाळी साजरी करताना युएई गोल्डन व्हिसा धारक १८ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं अहवालात समोर आलं आहे.

Alisha Khedekar

दुबईत दिवाळी साजरी करताना भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युएई गोल्डन व्हिसा धारक असलेल्या वैष्णवचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मिडलसेक्स युनिव्हर्सिटी व विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला

तरुणाईमध्ये झोपेचा अभाव, जंक फूडमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले

दुबईमध्ये दिवाळी साजरी करताना युएई गोल्डन व्हिसा मिळालेल्या १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. धक्कदायक म्हणजे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्याचं नाव वैष्णव कृष्णकुमार असून त्याच्या आकस्मित निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णव हा दुबईतील मिडलसेक्स युनिव्हर्सिटीमध्ये बीबीए मार्केटिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता. मंगळवारी दुबई इंटरनॅशनल अकादमिक सिटीमध्ये दिवाळी साजरा करताना तो अचानक कोसळला.त्याला कोसळल्याचे पाहून आजुबाजूला असलेले विद्यार्थी आणि शिक्षक वैष्णव भोवती गोळा झाले. शिक्षकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैष्णवचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं डॉक्टर यांनी सांगितले.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, दुबई पोलिसांचा फॉरेन्सिक विभाग पुढील तपास करत आहे. परंतु वैष्णव याला हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. तो एक बुद्धिमान आणि हुशार मुलगा होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला असून शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

वैष्णवाच्या जाण्याने तो शिकत असलेल्या मिडलसेक्स विद्यापीठाने शोक व्यक्त केला आहे. तसेच त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या मृत्यूमागे तरुणाईंची अपूर्ण झोप, जंक फूड असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, ४-५ वाहनांची जोरदार धडक

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली- वनमंत्री गणेश नाईक

Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव कार वरातीमध्ये घुसली; तिघांचा जागीच मृत्यू, १६ गंभीर

Aloe Vera For Skin Benefits: हिवाळ्यात चेहऱ्याला लावा कोरफड, त्वचा दिसेल एकदम फ्रेश

Pati Patni Aur Panga: 'या' कपलने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी; दुसऱ्या क्रमांकावर कोण? घ्या जाणून…

SCROLL FOR NEXT