Student Death Saam Death
देश विदेश

Student Death:अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; विद्यार्थ्याचं कोचिंग क्लासमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Student death Due To Heart Attack

मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला कोचिंग सेंटरमध्ये शिकत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत (Student Death) घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) असल्याचं स्पष्ट झालंय. विद्यार्थ्यांच्या जुन्या आरोग्य नोंदींची तपासणी केली जातेय. याप्रकरणी कुटुंबीयांचे जबाब घेतले आहेत. पुढील तपास सुरू आहे. (Latest News)

लोकसेवा आयोगाची तयारी करत होता

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदौरच्या भंवरकुआन भागात असलेल्या एका खाजगी कोचिंग सेंटरमध्ये घडली आहे. राजा लोधी, असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. राजा हा सागर परिसरातील रहिवासी होता. तो इंदौरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. तो येथे लोकसेवा आयोगाची तयारी करत होता. तो पदवीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. अभ्यासात देखील राजा अतिशय हुशार होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजाला अस्वस्थ वाटत होतं

बुधवारी दुपारी राजा लोधी नेहमीप्रमाणे कोचिंग सेंटरमध्ये पोहोचला. यावेळी त्याने त्याला थोडं अस्वस्थ वाटतंय, असं मित्रांना सांगितलं. त्याला खूप घाम येत होता. जेव्हा त्याला जास्त अस्वस्थ वाटू लागलं, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये (Heart Attack) नेलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण, सायंकाळी उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत (Student Death) घोषित केलं. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.

कुटुंबीयांनी केला आरोप

राजाचे वडील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात अभियंता आहे, असं तपासात समोर आलं आहे. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि मोठा भाऊ आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राजा अभ्यासात चांगला होता. कोचिंग सेंटरच्या मालकांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केलाय, असा आरोप राजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस कोचिंग सेंटरमधील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब घेतले आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

तरूणांमध्ये हृदयविकाराचा झटका

बदलत्या जीवनशैलीसोबत गेल्या काही वर्षांत आजारांचं प्रमाणही वाढलंय. तरूणांमध्ये देखील हृदयविकाराच्या झटक्याचं (Heart Attack) प्रमाण वाढत आहे. ताणतणाव, योग्य आहार न घेणं, व्यायामाचा अभाव यामुळं हे प्रमाण वाढत आहे. लोकांची जीवनशैली बदलत आहे, त्यामुळं तरूणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं. आपल्या आहारामुळे हे प्रमाण वाढलं आहे. आपल्या आहाराचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचं दिसतंय.

तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव असल्याचं दिसतो. बहुतेक तरूण तणावात आहे. तणावाचा अतिरेक झाला की, त्याचं रूपांतर नैराश्यात होते. नैराश्य आणि तणावामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका वाढत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

SCROLL FOR NEXT