GST On House Rent  Saam TV
देश विदेश

GST On House Rent | भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही भरावा लागणार जीएसटी; तुम्ही या कक्षेत आहात का? पाहा...

GST On Room Rent |१८ जुलैपासून, जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत अशा सर्व भाडेकरूंना घराच्या भाड्यावर १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

नवी दिल्ली: १८ जुलैला जीएसटीच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घर भाड्याने देण्यावरही जीएसटी (Goods and Services Tax Council | GST) भरावा लागणार आहे. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या लोकांना घर भाड्यावर (Home Rent) १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. १८ जुलैपासून, जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत अशा सर्व भाडेकरूंना घराच्या भाड्यावर १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागेल. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर निश्चित करण्यात आलेला जीएसटी १८ जुलैपासून लागू झाला आहे. (18% GST On House Rent)

हे देखील पाहा -

नवीन तरतुदींनुसार, आता जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांनी व्यवसाय करण्यासाठी कोणतेही घर भाड्याने घेतल्यास, त्यांना घराच्या भाड्यावर १८ टक्के दराने जीएसटी भरणे बंधनकारक असेल. यापूर्वी केवळ व्यावसायिक मालमत्तेवर जीएसटी आकारला जात होता. कॉर्पोरेट हाऊस किंवा व्यक्तीने निवासी वापरासाठी घर किंवा मालमत्ता भाड्याने घेतली असेल, तर त्यावर जीएसटी लागू होत नव्हता, आता मात्र त्यासाठीही जीएसटी लागू होणार आहे. (Govt clarifies GST on house rent)

जीएसटीच्या नवीन तरतुदींनुसार, भाडेकरू जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असेल आणि जीएसटी भरण्यास पात्र असेल तरच घराच्या भाड्यावर जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर घरमालकाला कोणत्याही प्रकारचा जीएसटी भरावा लागणार नाही. याशिवाय जीएसटीमध्ये नोंदणीकृत अशा सर्व व्यक्ती जे भाड्याने घेतलेल्या मालमत्तेतून आपली सेवा देतात त्यांनाही १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. जर पगारदार किंवा पगारदार व्यक्तीने निवासी घर किंवा घर भाड्याने घेतले तर त्याला जीएसटी भरावा लागणार नाही.

जीएसटी कायद्यातील बदलांची घोषणा जून महिन्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर करण्यात आली होती. जीएसटीचे नवीन नियम भाड्याच्या संदर्भात लागू होणार्‍या कंपन्यांच्या कक्षेत येतील. जे निवासी मालमत्ता गेस्ट हाऊस म्हणून वापरण्यासाठी घेतात किंवा त्यांच्या कर्मचार्‍यांना मोफत निवास सुविधा देतात. या सगळ्या सुविधांवर आता १८ टक्के दराने जीएसटी भरावा लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहांच्या बॅगांची तपासणी

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

SCROLL FOR NEXT