पश्चिम बंगालमधील नादिया येथे झालेल्या अपघातात 18 ठार; अनेक जखमी Saam Tv
देश विदेश

पश्चिम बंगालमधील नादिया येथे झालेल्या अपघातात 18 ठार; अनेक जखमी

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. उत्तर २४ परगणामधील बगदा येथील २० हून अधिक लोक मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार की, हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलबारी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला हा मॅटाडोर जोरात धडकला आहे. हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण ठार आणि जखमी झाले आहेत. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

SCROLL FOR NEXT