Ban YouTube Channel
Ban YouTube Channel Saam TV
देश विदेश

मोदी सरकारचा पुन्हा मोठा दणका!; भारतासह पाकमधील १६ YouTube चॅनेलवर बंदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्र सरकारने १६ युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. ही बंदी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Information and Technology) घातली असून या १६ युट्युब चॅनेलवर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसलविल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. (16 YouTube channels banned in India and Pakistan)

दरम्यान, या १६ YouTube चॅनेलपैकी भारतातील १० तर पाकिस्तानच्या (Pakistan) ६ यूट्यूब चॅनेल समावेश आहे. आपत्कालीन अधिकार वापरून हे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. बंदी घालण्याच आलेल्या या चॅनेल्सवरती खोट्या बातम्या पसरवल्याचा गंभीर आरोप आहेत. या यूट्यूब चॅनेल्सचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरविण्यासाठी होत होता असा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या चॅनेलवरती बंदी घालण्यात आली आहे त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या करोडोंमध्ये होती. या YouTubeआधारित न्यूज चॅनेल पाहणाऱ्यांची संख्या 68 कोटींपेक्षा जास्त होती. तसंच याआधीही केंद्र सरकारने चुकीची माहिती देणाऱ्या चॅनेलवरती बंदी केली होती. ५ एप्रिल ला देखील खोट्या बातम्या आणि भारतविरोधी मजकूर पोस्ट केल्याबद्दल I&B मंत्रालयाने २२ युट्यूब चॅनल ब्लॉक (Block) केले होते त्यामध्ये ४ पाकिस्तानी चॅनलचा देखील समावेश आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT