Karnataka News Saam Tv News
देश विदेश

Karnataka News: १५ वर्षीय मुलीचं ४५ व्यक्तीशी लावून दिलं लग्न, वडीलांच्या कृत्यामुळे गाव हादरलं..

Minor marriage incident Karnataka: वडील आणि मुलीचं नातं निखळ झऱ्यासारखं. पण एका बापानं आपल्याच १५ वर्षीय मुलीचं लग्न एका ४५ वर्षीय व्यक्तीसह लावून दिलं आहे. या घटनेनंतर गोरामाडुगू गाव हादरलं आहे.

Bhagyashree Kamble

वडील आणि मुलीचं नातं निखळ झऱ्यासारखं. पण एका बापानं आपल्याच १५ वर्षीय मुलीचं लग्न एका ४५ वर्षीय व्यक्तीसह लावून दिलं आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील गोरामाडुगू गावात घडली आहे. हे लग्न १५ वर्षांच्या मुलीच्या आईच्या संमतीशिवाय आणि तिच्या मर्जीशिवाय लावण्यात आले असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुठे घडली ही घटना?

कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील गोरामाडुगू गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लग्न एका ४५ वर्षी व्यक्तीशी बळजबरीनं लावण्यात आलं आहे. नारायण स्वामी असं वडिलांचं नाव असून, त्यांच्या दुसऱ्या बायकोची ती मुलगी आहे. या लग्नाच्या विरोधात त्याची आई देखील होती. पण त्यांनी आई आणि मुलीचं काहीही म्हणणं एकूण घेतलं नाही.

तसेच लग्न थांबवल्यास मुलगी आणि आईला शारीरिक इजा करण्याची धमकीही बापानं दिली होती. त्यानंतर बापानं बळजबरीनं अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं.

या लग्नाबाबत कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. गुपचूपरित्या हे लग्न पार पडलं. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. तसेच या प्रकरणात आणखीन कुणाचा सहभाग आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

या लग्नाची माहिती नीती आयोग आणि असोसिएशन फॉर व्हॉलंटरी अॅक्शन यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत माहीती पोलिसांना दिली. या संस्थांनी बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती केली होती. तसेच मुलींना आणि मुलांना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा, असे जनजागृतीच्या माध्यमातून ही संस्था आवाहन करत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT