14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून; मृतदेह दुकानात कोंडून आरोपी फरार  Saam TV
देश विदेश

14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून; मृतदेह दुकानात कोंडून आरोपी फरार

घटनेच्या दिवशी त्याने मुलीला भेटायला बोलावले अन्........

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिल्लीत महिलांवर अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. दररोज महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. आता नुकतेच एक ताजे प्रकरण नरेला शहरातून समोर आले आहे . जिथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर नराधमांनी मुलीचा गळा आवळून तिचा खून करुन मृतदेह दुकानात कोंडून ठेवला आणि तिथून पळ काढला. (New Delhi Rape Case)

संबंधीत प्रकरण हे नरेला येथील आहे. माध्यामांच्या माहितीनुसार, एक मुलगी जवळपास आठवडाभरापासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी बराच शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी नरेला येथील एका दुकानात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. जो या मुलीचे होता. मुलगी आठवडाभरापूर्वी जवळच्या दुकानात सामान घेण्यासाठी गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. यानंतर 19 फेब्रुवारी रोजी एका दुकानातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दुकानाचे शटर तोडले असता तेथे मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला.

मुलीला भेटायला बोलावून केला अत्याचार

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. अटक आरोपी सचिनने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याने मुलीला भेटायला बोलावले होते. यादरम्यान दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर मुलीचा गळा आवळून खून करून मृतदेह दुकानात टाकून शटर बंद करून पळ काढला. त्याचवेळी ही घटना घडवणारा दुसरा आरोपी सुनील हा अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपी मुलीचे ओळखीचे असून ते हरदोई येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

55 वर्षीय आईचा प्रियकराच्या मदतीने खून

दिल्लीतील मदनगीर परिसरात शनिवारी रात्री हृदय पिळवटून टाकणारा प्रकरण समोर आला होता. एका 24 वर्षीय मुलीने 55 वर्षीय आईचा तिच्या प्रियकराच्या मदतीने गळा चिरून खून केला होता. त्याचवेळी खून केल्यानंतर आरोपी मुलीने घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरून प्रियकराला दिले. जो घटनेनंतर पळून गेला. मात्र, आरोपीने आपल्या भावाला घरातील दरोडा आणि आईचा खून झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी ही बाब दिल्ली पोलिसांना कळवण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासानंतरच आरोपी मुलगी व तिच्या मित्राला अटक केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT