PCMC Election: महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला गळती

महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाऊ नये अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपातील (BJP) काही नाराज नगरसेवकांना केली आहे.
PCMC Election 2022 Updates
PCMC Election 2022 Updates Saam TV
Published On

पुणे: राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई यारख्या मोठ्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी चिंचवडमधील भारतीय जनता पक्षाला मोठी गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः प्रयत्न सुरू केले आहे. (Muncipal Corporation Election 2022)

महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाऊ नये अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपातील (BJP) काही नाराज नगरसेवकांना केली आहे. नाराज नगरसेवकांना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून ही विनंती केली आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील जवळपास पंधरा-सोळा नाराज नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

PCMC Election 2022 Updates
लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात 5 वर्षांच्या शिक्षेसह 60 लाखांचा दंड

अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज देखील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनी देखील आपला नगरसेविका पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे. भारतीय जनता पक्षात नागरिकाची विकास काम करण्यास अनेक अडचणी येत असल्याने आम्ही पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचं नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांनी सांगितलं.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com