सावधान : केरळात झिका व्हायरसचे 14 रुग्ण  saam tv
देश विदेश

सावधान : केरळात झिका व्हायरसचे 14 रुग्ण

1947 मध्ये झिकाची (Zika Virus) पहिली घटना आफ्रिकेत (Africa) नोंदली गेली होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिरुअनंतपुरम, वृत्तसंस्था :

केरळमध्ये (केरळ) झिका व्हायरसचा (Zika Virus) पहिला रुग्ण आढळून आल्याच्या घटना ताजी असतानाच आता केरळातील झिका व्हायरसची रुग्णसंख्या 14 वर पोहचली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री विणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य आरोग्य विभाग सतर्क झाले असून झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी केरळ आरोग्य प्रशासनाने विषाणू वाहक नियंत्रण उपक्रम (vector-control activities) मोठ्या स्तरावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. (14 patients with Zika virus in Kerala)

केरळ सरकारने झिका विषाणूच्या संक्रमणाची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी कृती योजनेवर काम सुरू केले असून या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. "सध्या केरळमध्ये झिका विषाणू रुग्णांची एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 14 इतकी आहे. परसाळा येथील एका गर्भवती महिलेमध्ये पहिल्यांदा झिका व्हायरस आढळून आला. प्रसूतीसाठी ती शहरात आली होती. तिने एका बाळाला जन्म दिला आणि दोघांचीही तब्येत ठीक आहे, अशी माहितीही यावेळी विणा जॉर्ज यांनी दिली.

''आम्ही सर्वप्रथम 19 नमूने पुणे येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV येथे पाठविले होते. त्यातील 13 सकारात्मक आढळले असल्याचे यावेळी विणा जॉर्ज यांनी सांगितले. त्यामुळे खबरदरीचा उपाय म्हणून, "विषाणू वाहक नियंत्रण उपक्रम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून या उपक्रमावर काम सुरू केले आहे. आमचा विभाग युद्ध पातळीवर सतर्क आहे. विषणूच्या संक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत."

- सहा सदस्यांची टीम केंद्रातून निघते

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. झिका विषाणूची काही प्रकरणे केरळमधून समोर आली आहेत. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि झिकाचे व्यवस्थापण करण्यासाठी सहा सदस्यांच्या टीमला तेथे पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ञ, डासांमुळे होणा-या रोगांचे तज्ञ आणि एम्सचे तज्ज्ञ आदींचा समावेश आहे.

झिका म्हणजे काय?

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रमाणेच झिका देखील डासांच्या चाव्याव्दारे पसरलेला एक आजार आहे. 1947 मध्ये झिकाची पहिली घटना आफ्रिकेत नोंदली गेली होती. परंतु 2015 मध्ये ब्राझीलमध्ये झिकाचा प्रचंड कहर माजला होता. त्यावेळी ही घटना प्रामुख्याने समोर आली. आता हा व्हायरस भारतात पोहोचल्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. एडीस डासांद्वारे झिका व्हायरसची लागण होते. मात्र, झिका व्हायरस बाधित व्यक्तीशी लैंगिक संपर्काद्वारे देखील पसरतो. 2016 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) झिकाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले होते. गर्भवती महिला तसेच तयांच्या जन्मलेल्या बाळांनादेखील झिकाचा धोका सर्वात जास्त असतो.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT