Gujarat News Saam Tv
देश विदेश

Gujarat News: 600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई

साम टिव्ही ब्युरो

Gujarat News:

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएस आणि एनसीबीने 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत 602 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस येत असल्याची माहिती मिळताच 14 पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी एटीएसवर गोळीबार सुरू केला. मात्र एटीएसला सर्वांना पकडण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सागरी सीमेजवळ ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी तात्काळ ऑपरेशन सुरु केले. गेल्या दोन दिवसांपासून ते गुजरातच्या किनारी भागात ऑपरेशन करत होते. अशातच रविवारी रात्री त्यांनी 14 पाकिस्तानी नागरिकांना अमली पदार्थांसह अटक केली.

दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत गुजरात आणि राजस्थानमध्ये मेफेड्रोन या औषधाची निर्मिती करणाऱ्या चार युनिटवर छापे टाकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे शुक्रवारी या युनिट्सवर संयुक्तपणे छापा टाकला. या छाप्यात 230 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

एटीएसने 22 किलो मेफेड्रोन आणि 124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त केले. याची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबादचे मनोहर लाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंग राजपुरोहित यांनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी युनिट्स स्थापन केल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT