भारत-चीन यांच्यात पार पडलेली 13 वी चर्चाही तोडग्याविनाच Saam Tv
देश विदेश

भारत-चीन यांच्यात पार पडलेली 13 वी चर्चाही तोडग्याविनाच

भारत आणि चीन दरम्यान कॉर्प्स कमांडर पातळीवर पार पडणारे चर्चासत्र आज संपली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : भारत आणि चीन दरम्यान कॉर्प्स कमांडर पातळीवर पार पडणारे चर्चासत्र आज संपली आहे. मात्र, चर्चेची १३ वे फेरी देखील आज निष्फळ ठरल्यामुळे सीमावर्ती भागात परत एकदा संघर्ष बघायला मिळू शकतो. गलवान खोऱ्यात चीनने सैन्य तैनात केल्यावर दोन्ही देशांमधील संबंध चिघळायला सुरुवात झाली आहे. यानंतर सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याकरिता भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र चीनच्या कुरघोड्यांनी यामध्ये चांगलेच अडथळे येत आहेत.

हे देखील पहा-

रविवारी झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चेच्या १३ व्या फेरीत हॉट स्प्रिंग्समध्ये पॅट्रोलिंग पॉइंट्स पीपी १५ पासून यासंदर्भात चर्चा झाली आहे. मात्र, चर्चेअंती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे दोन्ही बाजूंनी सोमवारी सकाळी स्वतंत्र निवेदन काढण्यात आले आहे. सीमावर्ती भागात उद्भवणाऱ्या परिस्थितीकरिता दोन्ही देशांनी एकमेकांना दोषी ठरवले आहे. ही स्थिती बदलण्याच्या चीनच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे हा गोंधळ झाल्याचं भारताने सांगितले आहे. तर, भारताने कठीण परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप चीनने यावेळी केला आहे.

एलएसीच्या बाजूने यथास्थिती बदलण्याच्या चीन सरकारच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे द्विपक्षीय करारांचे उल्लंघन झाले आहे. यामुळे परिपत्रक जारी करत असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले आहे. पश्चिम लडाख प्रांतात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने पावले उचलावी, असे यामध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. काल चुशुल- मोल्डो सीमावर्ती भागात कोर कमांडर स्तरावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लडाखच्या पूर्वेकडे प्रांतात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एलएसी दोन्ही बाजूंच्या कमांडर्सने समस्यांचे निराकरण करण्यावर चर्चा केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही : फडणवीस

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा गॅस टँकरचा अपघात, ब्रेक फेल झालं अन्...

SCROLL FOR NEXT