Russia Latest News
Russia Latest News Saam TV
देश विदेश

धक्कादायक! शाळेत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, ५ चिमुकल्यांसह १३ जणांचा मृत्यू, गोळीबारानंतरही केलं भयंकर कृत्य

Jagdish Patil

Moscow: रुस मधील एका शाळेत माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या गोळीबारामध्ये तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. याबाबत रुसच्या (Russia) गृह मंत्रालयाने आज सोमवारी माहिती दिली.

शाळेमध्ये झालेल्या या गोळीबारात मृत्यू झालेल्यांमध्ये ५ चिमुकल्यांचा समावेश आहे. तर या गोळीबारात २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रशियातील इझेव्हस्कमध्ये घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करणाऱ्याने माथेफिरुने देखील गोळीबारानंतर स्वत:ला संपविलं आहे. गोळीबार करणाऱ्याचा मृतदेह पोलिसांना सापडला असल्याची माहिती रशियाच्या गृह मंत्रालयाने एका टेलिग्राम चॅनलवर माहिती शेअर केली आहे.

पाहा व्हिडीओ -

तर रशियाच्या तपास संस्थेने टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गोळीबाराच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये दोन शाळेचे सुरक्षा रक्षक आणि दोन शिक्षकांसह ५ मुलांचा समावेश आहे. तर गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती टेलेग्रामवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, युक्रेन युद्धामुळे ((Russia Ukraine War) सध्या रशियातील वातावरण तणावपूर्ण आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच युक्रेनमध्ये आपले राखीव सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला होता अशातच हि घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT