एक से बढ़कर एक! 1-2 नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स होणार जुलै मध्ये लॉन्च  Saam Tv
देश विदेश

एक से बढ़कर एक! 1-2 नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स होणार जुलै मध्ये लॉन्च

रेडमी, रियलमी आणि सॅमसंग सारख्या ब्रँड गेल्या काही महिन्यांपासून सतत एकापेक्षा जास्त आश्चर्यकारक स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तेही अगदी स्वस्त किंमतीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : रेडमी, रियलमी आणि सॅमसंग सारख्या ब्रँड गेल्या काही महिन्यांपासून सतत एकापेक्षा जास्त आश्चर्यकारक स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तेही अगदी स्वस्त किंमतीत. ग्राहकाला एखाद्या स्मार्टफोन मध्ये काही त्रुटी काढायची संधी सुद्धा हे ब्रॅण्ड्स देत नाहीत. ग्राहकांची मन जिंकण्याचा प्रयत्न ते करत असतात. मग जाणून घेऊया त्या आश्चर्यकारक स्मार्टफोनविषयी. 11 smartphones will be launched in July

असे म्हंटले जात आहे की जूनप्रमाणेच आता या सर्व ब्रँड जुलैमध्ये आपले नवीन स्मार्टफोन बाजारात आणतील. जे जुलै महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. चला तर मग त्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

हे देखील पहा-

Techno Spark GO- 6.52- इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले त्यात देण्यात येईल. ड्युअल रियर कॅमेरा ज्यांचा प्राथमिक सेन्सर 13 मेगापिक्सेल असेल. यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि ब्लूटूथ सामायिकरण वैशिष्ट्य देखील समाविष्ट असेल. हा फोन ड्युअल-सिम सपोर्टसह येईल. यामध्ये एक शक्तिशाली मीडियाटेक हेलियो A 20 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन आज म्हणजेच 1 जुलैला लाँच केला जाईल.

Realme GT Master edition- यात 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, 12 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी दिली जाईल. हा फोन 4 जुलै रोजी लाँच केले जाऊ शकते.

Redmi K40- यात 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असणार आहे. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक 1200 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. फोनमध्ये 5065 एमएएचची बॅटरी देण्यात येईल. हा फोन 22 जुलैला लाँच केला जाऊ शकतो.

OnePlus Nord 2- यात 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्यांचा प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेल असेल. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी दिली जाईल.

Realme 9 Pro- 6.5 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले त्यात देण्यात येईल. तसेच 108 मेगापिक्सलचा रीअर प्राइमरी कॅमेरा देण्यात येईल. ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी देण्यात येईल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर आहे. हा फोन 22 जुलैला लाँच केला जाऊ शकतो.

Mi 11 Pro- यात 6.81 इंचाचा क्यूएचडी प्लस अमलोड प्लस डिस्प्ले असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्यांचा प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेल असेल. 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज प्रदान करणे अपेक्षित आहे. हा फोन 26 जुलै रोजी लाँच केला जाऊ शकते.

Realme GT Neo- यात 6.43-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक 1200 प्रोसेसर आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज प्रदान करणे अपेक्षित आहे. हा फोन 11 जुलैला लाँच केला जाऊ शकते.

Motorola Edge S- यात 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले HD+ LCD असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज प्रदान करणे अपेक्षित आहे. हे 14 जुलैला लाँच केले जाऊ शकते.

Redmi 10- यात 6.52 इंचाचा आयपीएस ISP एलसीडी डिस्प्ले असेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 13 मेगापिक्सेल असेल. फोनमध्ये 5100 एमएएच बॅटरी दिली जाईल. हे मेडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. यासाठी 3 जीबी रॅम दिली जाण्याची शक्यता आहे. त्याची लॉन्च तारीख अद्याप माहित नाही.

VIVO V21 Pro- यात 6.44-इंचाचा आयपीएस एलसीडी LCD डिस्प्ले असेल. तसेच क्वाड रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. त्यामध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचे प्राथमिक सेन्सर 44 मेगापिक्सेल आणि दुसरे 8 मेगापिक्सलचे असेल. फोनमध्ये 4300 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात ऑक्टा-कोर कैरो 475 प्रोसेसर आहे. त्याची लॉन्च तारीख माहित नाही.

POCO X3 GT- 6.67 इंचाचा सुपर एमोलेड Amoled डिस्प्ले त्यात देण्यात येईल. तसेच क्वाड रियर कॅमेरा ज्याचा प्राथमिक सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी दिली जाईल. यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हे 31 जुलैला लाँच केले जाऊ शकते.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT