पाकिस्तानात तुफान राडा गोळीबारात १० जणांचा मृत्यू SAam Tv
देश विदेश

पाकिस्तानात तुफान राडा गोळीबारात १० जणांचा मृत्यू

पाकिस्तान मधील आदिवासी भागात जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यावरून २ गटांमध्ये तुफान वादावादी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पाकिस्तान मधील आदिवासी भागात जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यावरून २ गटांमध्ये तुफान वादावादी होत आहे. या वादामधून झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. ही घटना पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात घडलेली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद शनिवारी दुपारनंतर सुरू झाला होता. पेशावरपासून २५१ किमी अंतरावर असलेल्या खुर्रम जिल्ह्यामधील तेरी मेगल गावात राहणाऱ्या गैदू टोळीच्या लोकांनी सरपणासाठी लाकूड गोळा करणाऱ्या पेवार टोळीच्या सदस्यांवर गोळीबार करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, खुर्रम जिल्ह्यात सबडिव्हिजवनमध्ये जंगलातील मालकी हक्कावरून २ गटांमध्ये वाद आहे.

हे देखील पहा-

यामुळे मागील काही महिन्यांपासून तणाव सुरू होता. एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, या धुमश्चक्रीमध्ये ४ जणांचा मृत्यू शनिवारी तर ६ अन्य लोकांचा मृत्यू पेवार समुदायाच्या लोकांना रविवारी केलेल्या प्रतिहल्ल्यात झाला आहे. बंदुकधाऱ्यांनी लपून हल्ला केला आहे. यावेळी दोन्हीकडून मोठी हत्यारे आणि रॉकेल लाँचरचा वापर करण्यात आला आहे.

उत्तर पश्चिम पाकिस्तान मधील खुर्रम जिल्ह्यात सीमा अफगाणिस्तानला लागून आहे. या ठिकाणी बंदुकीचा वापर आणि दहशतवादी हल्ले नेहमी होत असतात. दोन्ही गटात जेष्ठ व्यक्ती आणि सरकारी अधिकारी गैदू आणि पेवार टोळीमध्ये समेट घडवून आणण्याकरिता प्रयत्न करत आहेत. पोलीस आणि निमलष्करी दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. माहिती मिळेपर्यंत दोन्ही समुदायांमध्ये हा संघर्ष सुरू होता. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT