Jammu and Kashmir Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir: पुलवामा येथे ग्रेनेड हल्ला, एक प्रवासी मजूर ठार, दोन जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे ग्रेनेडने ही घटना घडवली.

पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले आहे. याबाबद जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे. सध्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. याआधी जूनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीय मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.

हे देखील पाहा -

मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. तर मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले ​​होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शोपियान जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आगलार जैनपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात चार मजूर जखमी झाले. बडगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक स्थलांतरित कामगार ठार झाला तर अन्य एक जखमी झाला. अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडल्या आहेत.

श्रीनगर शहरातील लालबाजार भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला तर दोन जण जखमी झाले.लाल बाजार भागातील जीडी गोयंका शाळेजवळ पोलिस नाकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात एएसआय मुश्ताक अहमद जागीच ठार झाले, तर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अबू बकर जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT