पुणेकरांना दिवाळीआधी दिलासा! दिवसभरात शून्य कोरोना मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांना दिवाळीआधी दिलासा! दिवसभरात शून्य कोरोना मृत्यू

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या आणि कोरोना महामारीचे हॉटस्पॉट म्हणून ठरलेल्या पुण्याला आज मोठा दिलासा मिळाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या आणि कोरोना महामारीचे हॉटस्पॉट म्हणून ठरलेल्या पुण्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांच्या मगरमिठीत अडकलेल्या मुंबई मागोमाग पुण्यातही आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाच्या प्रयत्नांना मोठ यश आले आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळून आला होता. यानंतर कोरोना मुंबईसह राज्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात पसरला होता. मागील २ वर्षांपासून पुणे शहर कोरोनाशी लढा देत आहे. अखेर या लढ्याला बळ देणारी घटना आज घडली असून, शहरात प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून ही आनंदवार्ता पुणेकरांसोबत शेअर केली आहे.

पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवर देखील नियंत्रण प्राप्त झाले आहे. आज तर महापालिका हद्दीमध्ये एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळाले आहे', असे महापौर मोहोळकर यांनी म्हटले आहे.

पुण्यात आज किती रुग्ण आढळून आले?

पुणे शहर हद्दीमध्ये आज ११२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात सध्या १५१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर १७८ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. दिवसभरात पुण्यात ११८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ९८८ इतकी आहे.

मुंबईमध्ये मागील २४ तासांत ४६३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ५५८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका आहे, कोरोना संसर्गाचा दर ०.०५ इतका आहे. सध्या मुंबईमध्ये ४५५० रुग्ण उपचाराधीन असून, रुग्ण दुप्पटीचा वेग 1१३२४ इतका आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

SCROLL FOR NEXT