bajrang dal, nagar saam tv
मुंबई/पुणे

Bajrang Dal News: बजरंग दलच्या शहर संयाेजकावर जीवघेणा हल्ला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सुशिल थाेरात

Nagar Crime News : बजरंग दलाचे शहर संयाेजक कुणाल भंडारी (bajrang dal president kunal bhandari) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना नगर (nagar latest news) शहरातील रामवाडी परिसरात घडली.

शहरात सोमवारी रात्री बजरंग दलाचे शहर संयाेजक कुणाल भंडारी आणि अशोक लोंढे यांच्यावर शहरातील रामवाडी परिसरात प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला अज्ञात हल्लेखोरांनी केला. या हल्ल्यात कुणाल भंडारी हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांचा शाेध घेण्यास प्रारंभ केला.

अशोक लोंढे आणि त्याचा भाऊ रस्त्यावरून जात असताना काही तरुणांनी त्यांना कट मारल्याने वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर चांगलेच हाणामारीत झाले. यामध्ये अशोक लोंढे यांच्या डोक्यामध्ये धारदार शास्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.

या दरम्यान त्या ठिकाणावरून जात असताना बजरंगाचे शहर संयोजक कुणाल भंडारी हे गर्दी पाहून थांबल्यानंतर त्या गर्दी मधील एका टोळक्याने कुणाल भंडारी यांना सुद्धा धार्मिक स्थळावर चादर चढवणारा हाच तो मुलगा आहे असे म्हणून त्यांच्यावरही हल्ला करून धारदार शास्त्राने जखमी केले.

रात्री हल्ल्याची घटना समजताच शहरातील विविध पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दवाखाना आणि तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पाेलिसांनी घटना समजताच शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला होता.

तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी कुणाल भंडारी आणि अशोक लोंढे यांच्या भावाच्या फिर्यादी नुसार खुनाचा प्रयत्न करणे आणि अट्रोसीटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. शहारत तणावपूर्ण शांतता असून पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त संवेदनशील ठिकाणांवर तैनात केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT