बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे: धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग झालाच नाही, 'हे' सत्य आलं समोर

पुण्यात धावत्या रिक्षात महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची घटना घडलीच नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: पुण्यात धावत्या रिक्षात महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची घटना घडलीच नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे. पीडितेनं भीतीपोटी पोलिसांत तक्रार केली. ही घटना हिंजवडीत घडली होती. घरात घुसून दोघांनी तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. पोलीस तपासात खरा प्रकार समोर आला आहे.

हिंजवडीत एका तरुणीवर घरात घुसून दोघा अज्ञातांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. त्यावर पीडितेनं प्रतिकार केला असता, तिला दोघांनी सिगारेटचे चटके दिले. पीडितेनं हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पाण्याची कॅन घ्यायला आल्याचे सांगून दोन्ही आरोपी घरात घुसले आणि त्यांनी तरुणीचा विनयभंग केला होता. त्यावेळी तरुणीनं आरडाओरडा केला. चिडलेल्या आरोपींनी तिला सिगारेटचे चटके दिले होते. याच तरुणीनं बंडगार्डन पोलिसांत धाव घेऊन, धावत्या रिक्षात चालकानं आणि त्याच्या साथीदारानं विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. भीतीपोटी तिनं अशा प्रकारची तक्रार केली होती.

हे देखील पहा-

मात्र, तसं काही घडलंच नव्हतं, अशी माहिती आता समोर आली आहे. हिंजवडीत या तरुणीचा विनयभंग झाला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. धावत्या रिक्षात असा काही प्रकार घडला नव्हता, असं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. त्यावर तिला पुन्हा विचारणा करण्यात आली. हिंजवडीत घरात घुसून तरुणांनी विनयभंग केला होता, असं तिनं सांगितलं. त्यामुळं धावत्या रिक्षात घटना घडली नसून, ती हिंजवडीत घडली आहे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT