सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

"तू तर पुष्पातील श्रीवल्ली" म्हणत पुण्यात दोन तरुणांकडून तरुणीचा विनयभंग!

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली संबोधून पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली संबोधून पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या दोघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि आरबाज अशी या दोघांची नावे आहेत. (Pune Crime News)

"तू पुष्पा चित्रपटातील हीरोइन श्रीवल्ली सारखी दिसतेस";

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यातील धनकवडी येथे राहायला आहे. काल रात्री याच परिसरात ती तरुणी आपल्या घराजवळ थांबली असताना , आरोपी सोहेलने तरुणीला पाहत शिट्टी वाजवायला सुरुवात केली आणि तू पुष्पा चित्रपटातील हीरोइन श्रीवल्ली सारखी दिसतेस; मला तुझ्या सोबत लग्न करायच आहे, असे म्हणत सोहेलने पीडीतेला मिठी मारली.

हे देखील पहा-

आरोपी फरार;

या सगळ्याच प्रकारानंतर पीडित तरुणीने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर तिचा सख्खा भाऊ तिथे आला. पण सोहेल आणि अरबाज या दोघांनीही त्याला मारहाण केली आणि तिथुन फरार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अरबाज आणि सोहेल यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

SCROLL FOR NEXT