Maval Crime दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील तरुणीला 15 लाखाला गंडवले

लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर स्वतःचे खोटे प्रोफाइल बनवून वेगवेगळ्या तरुणींना आर्थिक गंडा घालणाऱ्या या महाठकावर अशाच प्रकारचे तब्बल सात वेगवेगळे गुन्हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पिंपरी आणि पुणे याठिकाणी दाखल आहेत.

दिलीप कांबळे

मावळ- जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर खोटं प्रोफाइल तयार करून त्याद्वारे लोणावळा (Lonavala) शहरातील एका अविवाहित नोकरदार मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तब्बल पंधरा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रकार लोणावळ्यात घडला आहे. या प्रकरणातील आरोपीला (Accused) लोणावळा शहर पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श म्हात्रे उर्फ नहुश म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे असे या आरोपीचे नाव आहे. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर स्वतःचे खोटे प्रोफाइल बनवून वेगवेगळ्या तरुणींना आर्थिक गंडा घालणाऱ्या या महाठकावर अशाच प्रकारचे तब्बल सात वेगवेगळे गुन्हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पिंपरी आणि पुणे याठिकाणी दाखल आहेत.

हे देखील पहा -

या तरुणीने जीवनसाथी डॉट. कॉम या संकेतस्थळावर एप्रिल 2021 मध्ये प्रोफाईल तयार केले होते. तेव्हा नहुश म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजलसाठी फिर्यादी तरुणीला रिक्वेस्ट आली. त्यानंतर तरुणी आणि आरोपी यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला लग्न करण्याबाबत विचारणा केली. तरुणीकडून आरोपीने एप्रिल 2021 पासून जानेवारी 2022 पर्यंत वेगवेगळी कारणं सांगत तब्बल 15 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने प्राप्त केले.

त्यानंतर संबंधित तरुणीने आपले पैसे देणेबाबत आरोपीला फोन केला असता त्याने तरुणीला शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT