मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! कल्याणीनगर पुलावरून उडी मारून तरुणाने आयुष्य संपवलं, कारण अस्पष्ट

Crime News: पुण्याच्या कल्याणीनगर पुलावरून 35 वर्षीय तरुणाने काल रात्री १०:३० वाजता उडी मारून आत्महत्या केली. येरवडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

Dhanshri Shintre

पुण्यातील कल्याणीनगर पुलाकडे एक धक्कादायक घटना घडली. काल रात्री १०:३० वाजता ही घटना घडली. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणी नगर पुलावरून या तरुणाने उडी मारली आणि पाण्यात बुडून मरण पावला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शोधून ससून रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस तपास करत असून, मृतकाची ओळख शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सध्या या घटनेमागील कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 35 वर्षीय इसम ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याच्या आसपास कोणतीही व्यक्ती दिसली नाही.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि ससून रुग्णालयात पाठवला. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, आणि आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास जोरात चालू आहे.

कल्याणीनगर परिसरात ही घटना घडल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे. आत्महत्येच्या मानसिक आणि सामाजिक कारणांवर देखील विचार केला जावा, असेही स्थानिक नागरिकांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT