Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! गर्लफ्रेंडच्या मित्राने तिच्याच समोर केली जबर मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंड समोर मारहाण केली म्हणून एका २० वर्षांच्या बॉयफ्रेंड मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायकघटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड भोसरी पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आळंदी रोडवर ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक संतोष कुतवळ असं आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, प्रतीक संतोष कुतवळ असं त्या तरुणाचे नाव आहे. प्रथमेश महादू पठारे आणि प्रतीक कुतवळची गर्लफ्रेंड ही एकमेकांच्या तोंड ओळखीची होती. जेव्हा प्रतीक आपल्या गर्लफ्रेंडशी बोलत होता, त्यावेळी प्रथमेश महादू पठारे याने त्याला पाहिले आणि त्याचा संताप अनावर झाला.

यावेळी प्रथमेश महादु पठारे याने रागात येऊन प्रतीक कुतवळ याच्या गर्लफ्रेंड समोर त्याला जबर मारहाण केली होती. त्यातूनच त्याच्यात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने २५ जून २०२२ ला आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सखोल तपास करून भोसरी पोलिसांनी (Police) प्रथमेश महादू पठारे या वीस वर्षाय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न! दहशत माजवणाऱ्यांना आणलं गुडघ्यावर; प्रतिज्ञा,भरस्त्यात मारायला लावल्या उड्या

Crime: नवरा कामाला गेला, समलिंगी पार्टनरसाठी आईकडून ५ महिन्यांच्या बाळाची हत्या; मृतदेहासोबत फोटो काढून पाठवले

Stray Dogs Issue: शाळा, कॉलेज रेल्वे स्थानक परिसरातील भटके कुत्रे हटवा; नसबंदी केलेल्यांना शेल्टर होममध्येच ठेवा, SC चे निर्देश

Jio, Airtel, Vi बजेट फ्रेंडली प्लॅन्स, ३ महिन्यांसाठी 'हे' आहेत परवडणारे रिचार्ज

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

SCROLL FOR NEXT