योगेश जगताप हत्या प्रकरण; चाकण परिसरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

योगेश जगताप हत्या प्रकरण; चाकण परिसरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक

गोपाल मोटघरे, रोहिदास गाडगे

गोपाल मोटघरे, रोहिदास गाडगे

पिंपरी : पिंपळे गुरव (Pimpale Gurav) येथे सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करून पसार झालेल्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. तर, पोलिसांनाही स्वसंरक्षणासाठी आरोपींच्या दिशेने गोळीबार केला आहे. ही चकमक चाकण जवळ घडली आहे.

योगेश जगताप ( वय 37, रा. पिंपळे गुरव) या सराईत गुन्हेगाराचा गेल्या शनिवारी पिंपळे गुरवमधील काटे पुरम चौकात खून झाला होता. याप्रकरणी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात योगेशचा मृत्यू झाला. यामध्ये सुरुवातीला दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले. मात्र इतर आरोपी फरार होते. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तत्काळ पोलिसांची चार पथके रवाना झाली.पोलिसांना पाहताच आरोपीनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. यामध्ये एक पोलिस जखमी झाला. पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. अधिक तपास सुरू आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, योगेश जगताप खून प्रकरणातील मुख्य आरोपी अश्विन चव्हाण आणि गणेश माटे यांनी इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर पिस्तूल (Gun) हातात घेऊन स्टेटस ठेवले होते. ज्यामध्ये बॅकग्राउंडला दहशत पसरवणारे डायलॉग देखील लावले आहेत. तर, आरोपींनी या व्हिडीओतून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, असं असतानाही त्याच्या स्टेटसला अनेकांनी लाईक आणि कमेंट्स केले. पोलिसांच्या सायबर सेलकडून त्याच्या स्टेटसला लाईक आणि कमेंट करणाऱ्यांची सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT