Shocking visuals from Yerwada Mental Hospital quarters reveal drug packets, syringes, and severe neglect inside the premises. saam tv
मुंबई/पुणे

पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात ड्रग्ज, कंडोमचा साठा; प्रशासन झोपलंय का?

Drug Den Inside Yerwada Mental Hospital: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये ड्रग्ज, सिरिंज आढळून आले आहेत.

Suprim Maskar

येरवडा मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना सफाई कामाला जुंपल्याचा प्रताप साम टीव्ही नं समोर आणला आणि याचं मनोरुग्णालायतील आणखी एक धक्कादायक माहिती सामच्या हाती लागली..... ड्रग्ज, सिरिंज आणि कंडोम.... ही दृश्य आहेत...पुणे प्रादेशिक मनोरुग्णालायतील... मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली हे सरकारी क्वार्टर्स आज नशेखोरांचा अड्डा झालेत...या बंद खोल्यांमध्ये ड्रग्सची पाकीटं पडल्याचं आपण पाहू शकता...विशेष म्हणजे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आयटी पार्क आणि पोलीस स्टेशन आहे, तरीही पोलिसांना या नशेच्या बाजाराची भनक कशी लागली नाही? हा प्रश्न आता उपस्थित होतोय....

खरतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स दिले जातात... मात्र कर्मचारी जेव्हा रिटायर होतो, तेव्हा क्वाटर्सचं रुपातंर ड्रग्जच्या अड्ड्यात होतयं... त्यामुळे पुण्यात अजूनही ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय..

दुसरीकडे जेव्हा साम टीव्हीनं या परिसराची पाहणी केली... तेव्हा ड्रग्जसोबतच मनोरुग्णालयात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसून आलं.. एवढच नव्हे तर मनोरुग्णालयातील क्वार्टर्सची अवस्था गुरांच्या गोठ्यापेक्षाही वाईट होती..

दरम्यान साम टिव्हीनं येरवडा मनोरुग्णालयातील गैरसोयींचा विषय लावून धरला आणि प्रशासकीय यंत्रणेसह स्थानिक लोकप्रतिनिधींनीचीही तारांबळ उडाली..

एकीकडे मनोरुग्णालयात ड्रग्जच्या पाकीटांचा खच आणि दुसरीकडे रुग्णालयाच्या ठेकेदारानं मनोरुग्णांना सफाई कामाला जुंपणं यामुळे आरोग्य व्यवस्थेचे पार धिंडव़डे निघालेत... आता आरोग्य विभाग या घटनेची गंभीर दखल घेऊन मनोरुग्णालयातील या ड्रग्जच्या अड्ड्यावर बुलडोझर चालवणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IT क्षेत्रातील महिलांच्या शोषण प्रकरणी महिला बालकल्याण विभाग लक्ष घालणार

Airport Fire: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १मध्ये लागली आग; सर्वत्र धूर, प्रवाशांची पळापळ

यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार; eKYC वर बोलताना आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

ठाकरेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग; आगामी काळात मोठ्या बदलाचे संकेत, VIDEO

युद्धाची आग पुन्हा पेटणार? युद्धखोर इस्रायलनं युद्धविराम तोडला

SCROLL FOR NEXT