Kirit somaiya Vs Uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Yakub Memon: एका बाजूला भ्रष्टाचाराचे, दुसऱ्या बाजूला याकूबचे..., किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

याकूब मेमन याला शहिद याकूब मेमन बनवण्याचे जे पाप केले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - सोमय्या

Jagdish Patil

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई बॉम्बस्फोटातील दशहतवादी याकूब मेमन (Yakub Memon) याच्या कबरीवरुन आता राज्यातील राजकारण (Politics) चांगलचं तापलं आहे. याकूबची कबरीचं सुशोभीकरण केल्याची घटना समोर आल्यामुळे भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला आहे.

एवढंच नव्हे तर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील (Mumbai Bomb Blast) पिडीत ईश्वर साकडे, नरेश सराफ यांना आपल्यासोबत घेत आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महापालेकेवर अनेक गंभीर आरोप केले.

या पत्रकार परिषदे बोलताना सोमय्या यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील पीडितांना आपल्याजवळ बोलवत त्यांना बॉम्बस्फोटामुळे झालेल्या इजा दाखवत 'हे पहा बॉम्बस्फोटाचे परिणाम, यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलणार का? आयुक्त बोलणार का? असा सवाल उपस्थित केला.

पाहा व्हिडीओ -

तसंच यावेळी नरेश सराफ या पिडीताचा उजवा पाय गेला, ईश्वर साकडे यांना गोळी लागली आहे आणि हे लोक 30 वर्षानंतर याकूबचे स्मारक बांधायला निघाले आहेत. अशी टीका सोमय्या यांनी केली.

ते पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे स्मारक आहे. त्यासाठी काल मी दापोलीला गेलो होतो. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे स्मारक उध्वस्त करायचे तर दुसरीकडे हे लोक हिरव्या रंगात रंगले आहेत. 1993 च्या ब्लास्टमधील अतिरेक्यांचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहेत.

एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे आहे. तर दुसऱ्या बाजूला याकूबसारख्या दहशतवाद्याचे स्मारक देखील करत आहेत. याकूब मेमनचे स्मारक बनवतात म्हणून आम्ही प्रतिज्ञा केली आहे की, मुंबई पालिकेतील माफियाराज संपवणार, शिवाय यासर्व प्रकरणावर आयुक्तांनी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी देखील सोमय्यांनी केली. याकूब मेमन याला शहिद याकूब मेमन बनवण्याचे जे पाप केले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असंही सोमय्या म्हणाले.

या पत्रकार परिषदेदरम्यान सोमया यांनी रवींद्र वायकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. महाकाली गुंफेमध्ये रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. 500 कोटींचा हा घोटाळा असून या गुंफेसाठी बिल्डरला 500 कोटी दिले आणि हे बिल्डर कोण अविनाश भोसले. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये, डावा हात अनिल परब रिसॉर्ट तूटणार आहे, तर तिसरा हात वायकर याने घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT